शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

फॉर्महाऊसमधील सेप्टिक टँकमध्ये गुदमरून एकाच कुटुंबातील पाच मजुरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 08:10 IST

या दुर्दैवी घटनेत एका मजुराची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- गणेश नीरस सोनपेठ तालुक्यातील भाऊचातांडा  शेत शिवारात मारोती दगडु राठोड यांच्या आखाड्यावर सेप्टिक टँक सफाईचे काम करताना गुरुवारी ( दि ११)  रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान गुदमरुन पाच मजुरांचा मृत्यू झाला. तर एका मजुराची प्रकृती गंभीर आहे. हे सर्व मजूर एकाच कुटुंबातील असल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शेतशिवारात मारोती राठोड यांचे शेत आहे. या शेतात त्यांचे फॉर्महाऊस आहे. येथील सेप्टिक टँकची सफाई करण्यासाठी विठ्ठल राठोड यांनी सोनपेठ शहरातील सफाई कामगारांना बोलवले होते. गुरुवारी दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान सहा मजूर  फॉर्महाऊस वर हजर झाले. सफाई सुरू असताना रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान एकजण टँकमध्ये बेशुद्ध पडला. त्याला वाचविण्यासाठी एकेक करून इतर पाच जण आत गेले. मात्र कोणीच बाहेर येत नसल्याने बाहेरील एकाने आरडाओरडा केला. राठोड तिथे आले पण तोपर्यंत उशीर झाला होता. माहिती मिळताच सोनपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने टँकवरीस स्लॅब फोडण्यात आला. त्यानंतर गुदमरून बेशुद्ध झालेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आले. मात्र यातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर एका मजुराची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर परळी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 मृतांची नावे : १) शेख सादेक वय ४५२) मुलगा : शेख शाहरुख वय २०३) जावई : शेख जुनेद वय २९ ४) भाऊ : शेख नविद वय २५५) चुलतभाऊ : शेख फिरोज वय १९

६) जखमी: शेख साबेर वय १८

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीDeathमृत्यू