शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

जिनिंगमध्ये आगीचे तांडव; कापूस, सरकी, मशीन जळून लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 15:40 IST

मानवत येथील गजानन अॅग्रो जिनिंगमधील घटना 

मानवत (परभणी): रूढी शिवारातील गजानन अॅग्रो जिनिंग-प्रेसिंगमध्ये अचानक लागलेल्या आगीतकापूस, सरकी, मशीन्स खाक झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  

तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६१ वर गजानन अॅग्रो जिनिंग-प्रेसिंग आहे. हंगाम सुरू असल्याने जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केलेला कापूस पुढील प्रक्रियेसाठी एका शेडमध्ये ठेवण्यात आला आहे. कालच गठन बांधण्याचे काम सुरु झाले आहे. दरम्यान, पहाटे साडेबारा वाजेच्या सुमारास  मशीन जवळील कापसाने अचानक पेट घेतला. सर्वत्र कापूसच असल्याने  जिनिंग परिसरात झपाट्याने आग वाढत गेली. 

जिनिंग मालकाने लागलीच मानवत नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. मात्र, मानवत येथील अग्निशमन दलाचे वाहन पाथरी तालुक्यातील गुंज येथे आग विझवण्यासाठी गेल्याने वेळेत उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे जिनिंग मालकांनी गंगाखेड, परळी, जालना, धारूर या ठिकाणाहून अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाला येण्यासाठी एक ते दीड तासांचा वेळ लागल्याने संपूर्ण कापूस, शेजारच्या शेडमधील सरकीने जळून खाक झाली. 

आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय करनूर, सपोनी प्रभाकर कापुरे, आनंद बनसोडे, पोलीस कर्मचारी नरेंद्र कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाचे वाहन पोहोचल्यानंतर आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

टॅग्स :fireआगparabhaniपरभणीcottonकापूस