शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत पाठबंधारे विभागाच्या कार्यालयाला आग, जुनी महत्वपूर्ण दस्ताऐवज जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 16:43 IST

जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या परिसरात असलेल्या मांजरा प्रकल्प उपविभाग क्रमांक २ या कार्यालयास आज  पहाटे आग लागली.

परभणी :  येथील जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या परिसरात असलेल्या मांजरा प्रकल्प उपविभाग क्रमांक २ या कार्यालयास आज  पहाटे आग लागली. आगीत जुने व महत्त्वपूर्ण असलेले हजारो दस्ताऐवज जळून खाक झाले आहेत.  

येथील जायकवाडी परिसरात मांजरा प्रकल्प उपविभाग क्रमांक २ या विभागाचे कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय आहे़ निम्न दूधना प्रकल्पा अंतर्गत या कार्यालयाचा कारभार चालतो़ निम्न दूधना प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचे महत्त्वपूर्ण दस्ताऐवज या कार्यालयात ठेवलेली आहेत़ २९ मे रोजी रात्री २़३० वाजण्याच्या सुमारास कार्यालयातील दस्ताऐवज असलेल्या खोलीलाच आग लागली़ विशेष  म्हणजे या खोलीच्या शेजारील खोलीतही महत्त्वपूर्ण जुने दस्ताऐवज ठेवले होते़ त्या खोलीलाही आग लागली़ या आगीत निम्न दूधना प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या जमिनींचे महत्त्वूपर्ण दस्ताऐवज तसेच संयुक्त मोजणी अहवाल, शेतकऱ्यांचे रजिस्टर आदी कागदपत्रे जळून खाक झाली

विशेष  म्हणजे शेतकऱ्यांच्या अनुषंगाने या कागदपत्रांना महत्त्व आहे़ परंतु, नेमकी हीच कागदपत्रे आगीत जळाल्याने ही आग लागली की लावली ? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ रात्री २़३० वाजेच्या सुमारास आग लागल्यानंतर अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले़ त्यानंतर ही आग विझविण्यात आली़ या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली़ 

५५० दस्ताऐवज जळून खाकजायकवाडी परिसरातील मांजरा प्रकल्पाच्या या कार्यालयास लागलेल्या आगीमध्ये सुमारे ५६७ दस्ताऐवज जळून खाक झाल्याची माहिती  मिळाली आहे. यात सर्च रिपोर्ट, सातबारा व इतर कागदपत्र जळाल्याची माहिती मिळाली़ त्याच प्रमाणे अतिक्रमणाबाबतची संचिका, भूमिअभिलेख प्रस्ताव पोहनेर, लोकअदालत संचिका, संयुक्त मोजणी संचिका आणि १६ गावांमधील संयुक्त मोजणी नकाशे जळाल्याचा अंदाज आहे़ 

टॅग्स :fireआगFarmerशेतकरीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी