शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहरात वडापावच्या गाडीला आग, दोन सिलेंडरचा स्फोट; शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली घटना

By राजन मगरुळकर | Updated: January 12, 2025 12:21 IST

तुलसी हॉटेल समोर वसमत रोड येथे मातोश्री वडापाव गाड्याला आग लागल्याची माहिती रवि बाळासाहेब मोरे यांनी दिली त्या प्रमाणे घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणुन पूर्णपणे थांबविली. यात दोन गॅस सिलेंडर व  इतर साहित्य आगीत जळाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

राजन मंगरूळकर -

परभणी : शहरातील वरदळीच्या वसमत महामार्ग रस्त्यावर शिवशक्ती बिल्डिंग परिसरात एका वडापावच्या गाडीला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री पावणे बारा ते १२ यादरम्यान घडली. त्यामध्ये दोन सिलेंडरच्या स्फोट होऊन मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर त्वरित परभणी महापालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गवते आणि कर्मचारी सुद्धा आले होते. तुलसी हॉटेल समोर वसमत रोड येथे मातोश्री वडापाव गाड्याला आग लागल्याची माहिती रवि बाळासाहेब मोरे यांनी दिली त्या प्रमाणे घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणुन पूर्णपणे थांबविली. यात दोन गॅस सिलेंडर व  इतर साहित्य आगीत जळाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

प्र. अग्निशमन केंद्र अधिकारी डी. यू. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जवान उमेश कदम, अक्षय पांढरे, वाहन चालक वसीम अखिल अहेमद हे दाखल झाले होते. रविवारी सकाळी अनेक नागरिकांना या घटनेची माहिती होताच त्यांनी घटनास्थळी जाऊ काय नुकसान झाले, स्फोट कसा झाला याची माहिती घेतली. दोन्ही सिलेंडर जोरात फुटल्याने या वसमत महामार्गावर मध्यरात्री मोठा आवाज आणि आगीचे लोट पसरले होते.

टॅग्स :fireआगBlastस्फोटCylinderगॅस सिलेंडरFire Brigadeअग्निशमन दल