शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

परभणी कोंबिंग ऑपरेशनमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: खा. चंद्रकांत हंडोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 11:57 IST

संविधानांची विटंबना करणारा हा मानसिक रुग्ण असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत, तर तो वारंवार समाजाची माफी मागत आहे. मनोरुग्णाला कसे काय समजले की, आपण संविधानांची विटंबना केली.

छत्रपती संभाजीनगर : परभणी येथे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनच्या दरम्यान जे-जे अधिकारी, कर्मचारी सहभागी होते, त्या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रमुख तथा खा. चंद्रकांत हंडोरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

ते परभणी येथे वाकोडे व सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जात असताना, काही काळ छत्रपती संभाजीनगर शहरात थांबले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी परभणी दंगलीप्रकरणी केलेली घोषणा आणि तेथील नागरिकांच्या प्रतिक्रिया याचा आढावा घेण्यात येणार असून, तो अहवाल राहुल गांधी यांच्याकडे सोपवणार असल्याचेही सांगितले. संविधानांची विटंबना करणारा हा मानसिक रुग्ण असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत, तर तो वारंवार समाजाची माफी मागत आहे. मनोरुग्णाला कसे काय समजले की, आपण संविधानांची विटंबना केली, असा प्रश्न उपस्थित करीत मुख्यमंत्री हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा त्यांनी आरोप केला.

मनुवादी संस्कृतीसाठी धडपडभाजप, आरएसएसचा संविधान बदलणे हा ‘अजेंडा’ आहे. भाजप मनुवादी संस्कृती लादण्यासाठी धडपडत आहे. भाजपचा मनुवादी चेहरा सर्वांसमोर आल्याने ते विविध मार्गांनी दबाव बनवत हे प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न करत असल्याचे हंडोरे म्हणाले.

कारवाईतून इशारासंविधानाच्या विटंबनेनंतर दलित समाज रस्त्यावर उतरला. हा विरोध मोडून काढण्यासाठी तरुणांवर गंभीर गुन्हे दाखल केले. पोलिस कोठडीत तरुणांची हत्या केली. तुम्ही विरोध कराल, तर तुमचे असे हाल करू, जणू असा इशाराच या कारवाईच्या निमित्ताने दिल्याचे हंडोरे म्हणाले. पत्रकार परिषदेला दिनकर ओंकार, संतोष भिंगारे, राजू जाधव, भाऊसाहेब नवगिरे, शरद शिवतारे, संजय पटेकर, सुदाम सरोदे, कैलास जंबडे, प्रा. धनंजय रायबोले, शशिकांत बनसोडे, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीcongressकाँग्रेसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर