शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या मुलाचा गंगाखेड तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 18:05 IST

फेरफार करण्यास विलंब करीत गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या महिला तलाठ्याच्या मनमानीला कंटाळुन कोद्री येथील शेतकऱ्याच्या मुलाने अंगावर रॉकेल ओतुन घेत तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

गंगाखेड (परभणी ) : फेरफार करण्यास विलंब करीत गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या महिला तलाठ्याच्या मनमानीला कंटाळुन कोद्री येथील शेतकऱ्याच्या मुलाने अंगावर रॉकेल ओतुन घेत तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली.

गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथील वडिलोपार्जित शेतजमीनीचा वाद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात चालु होता याप्रकरणी दि. २० जानेवारी २०१८ रोजी उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी अनिरुद्ध एकनाथ लटपटे यांच्या बाजूने निकाल दिला. अपिलार्थी यांचे अपिल मान्य करीत कायदेशीर वारस घेतलेल्या फेरफार क्रमांक ७७८ बाबत कुठलाही हस्तक्षेप न करता तो कायम करण्याचे व नोंदणीकृत हक्कसोड नोंदविण्यात आलेला फेरफार क्रमांक २५४० हा बेकायदेशीर ठरवून तो फेरफार तसेच अनाधिकाराने विक्री व्यवहारातून झालेला फेरफार क्रमांक २६५९ हा रद्द करण्याचा आदेश निकालात दिला होता. 

गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी

या निकालाची प्रत अनिरुद्ध एकनाथ लटपटे यांनी कोद्री सज्जाच्या तलाठी प्रियंका सखाराम उकंडे यांच्याकडे देऊन उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाचे पालन करण्याची विनंती त्यांच्याकडे वारंवार केली होती. मात्र तलाठी उकंडे यांनी फेरफार रद्द करून दुसरे फेरफार घेण्यास विलंब केल्याचा व या कामासाठी सहा ते सात वेळा परभणी येथे बोलावुन घेत काम करण्यास चालढकल केली. याप्रकरणी अनिरुद्ध एकनाथ लटपटे यांचा मुलगा नागनाथ उर्फ लखन लटपटे यांनी सुध्दा तलाठी उकंडे यांच्याकडे काम करण्याबाबत विनंती केली असता त्यांनी मला वारंवार फोन करुन तगादा लावुन त्रास का देता मी महिला आहे असे म्हणत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने तलाठ्याच्या त्रासाने त्रस्त झालेल्या नागनाथ लटपटे यांनी मंगळवार रोजी तहसिल कार्यालयात अंगावर रॉकेल ओतुन घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी येथे उपस्थित नागरिकांनी पोलीसांना फोन करून याची माहिती दिली. यानंतर पोलीस निरीक्षक सोहन माछरे, पोउपनि रवि मुंडे, सपोउपनि मोईनोद्दीन पठाण, जमादार वसंत निळे, उमाकांत जामकर, शेख जिलानी, सुग्रीव कांदे, सतीश दैठणकर, अव्वल कारकुन दत्तराव बिलापट्टे, तलाठी शिवाजी मुरकुटे आदींनी तहसील कार्यालयात धाव घेऊन नागनाथ यास ताब्यात घेतले. यावेळी चांगलाच गोधळ उडाला होता.

दोषींवर कार्यवाही करण्याचे आदेशफेरफार करण्यास विलंब होत असल्याच्या कारणाने व तलाठ्याने गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने शेतकऱ्याच्या तरुण मुलाने अंगावर रॉकेल ओतुन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उपविभागीय अधिकारी गावंडे, तहसीलदार जिवराज डापकर यांच्या समक्ष घडल्याने याप्रकरणी कोद्री सज्जातील फेरफार करण्यास विलंब का झाला याची माहिती घेण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली मंडळ अधिकारी, तलाठी यांची चौकशी समिती नेमुन दोषींवर कार्यवाही करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी विश्वांभर गावंडे यांनी दिले.

टॅग्स :TahasildarतहसीलदारFarmerशेतकरीagricultureशेती