शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पाथरीत तूर आणि हरभरा खरेदीचे 6 कोटी 62 लाखाचे चुकारे अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 18:57 IST

शासनाने पाथरी प्रथमच  हमी भावातील तूर आणि हरभरा खरेदी केंद्र सुरु केले.मात्र,या केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या तूर आणि हरभरा पिकांचे तब्बल 6 कोटी 62 लाख रुपये चुकारे अद्यापही ही मिळाले नाहीत.

पाथरी (परभणी ) : शासनाने पाथरी प्रथमच  हमी भावातील तूर आणि हरभरा खरेदी केंद्र सुरु केले.मात्र,या केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या तूर आणि हरभरा पिकांचे तब्बल 6 कोटी 62 लाख रुपये चुकारे अद्यापही ही मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकरी आपला माल हमी भाव खरेदी केंद्रावर विक्री करून अडचणीत सापडला आहे.

पाथरी तालुक्यासाठी मानवत येथे हमीभाव खरेदी केंद्र ठेवण्यात आले.या भागातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन एप्रिल महिन्यात पाथरी येथे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि नाफेडच्या वतीने हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. यानुसार तूर  5400 तर हरबरा 4400 रुपये दराने खरेदी करण्यात आला. 

या केंद्रावर 18 एप्रिल ते 13 जून या काळात 253 शेतकऱ्यांची 3892 क्विंटल तूर तर 829 शेतकऱ्यांचा 10289 क्विंटल हरभरा बाजार समिती मार्फत खरेदी करण्यात आला. यानुसार तुरीचे 2 कोटी 12 लाख 14 हजार 125 तर हरभऱ्याचे 4 कोटी 52 लाख 3 हजार 400 रुपये चुकारे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. 

पहिल्याच वर्षी अडचणपाथरी तालुक्यात या वर्षी पहिल्यांदा च शासनाने हमी भाव खरेदी केंद्र सुरू केले, केंद्र सुरू झाल्यावर शेतकऱ्यांची गैरसोय कमी होईल असे वाटत होते मात्र हमी भावावर घेतलेल्या मालाचे चुकारे मिळत नसल्याने शेतकरी अधिक च अडचणीत सापडला आहे

शेतकरी अडचणी तशासनाच्या हमी भाव खरेदी केंद्रावर शेतकरी चांगला भाव मिळेल म्हणून माल विक्री करण्यास आणतात.मात्र,माल विक्री करून वेळेत रक्कम मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत-अनिल नखाते,सभापती,बाजार समिती, शेतकऱ्यांकडून सतत विचारणाहमी भाव केंद्रावर शेतकऱ्यांनि आपला माल विक्री केला, खरेदी नंतर शेतकरी मालाचे चुकारे कधी मिळतील यासाठी वाट पाहत आहेत, सतत विचारणा होत आहे, मात्र अद्याप रक्कम उपलब्ध झाली नाही -बी एस कुटे, सचिव बाजार समिती पाथरी

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रState Governmentराज्य सरकारfundsनिधी