शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या नापिकीला कंटाळून उमरा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 16:03 IST

सततची नापिकी असल्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने  कुटुंबाचा उदनिर्वाह कसा चालवायचा या विवंचनेत असणाऱ्या उमरा येथील एका शेतकऱ्याने गुरुवारी (दि.१२ ) विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.

पाथरी (परभणी ) : मागील काही वर्षात शेतात सततची नापिकी असल्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने  कुटुंबाचा उदनिर्वाह कसा चालवायचा या विवंचनेत असणाऱ्या उमरा येथील एका शेतकऱ्याने गुरुवारी (दि.१२ ) विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. कृष्णा कोल्हे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी पाथरी पोलीस स्थानकात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालूक्यातील उमरा येथील शेतकरी कृष्णा शेषराव कोल्हे यांची उमरा शिवारात शेती असून त्यांनी शेतीवर बँकेकडून कर्ज घेतले होते. यातच मागील काही वर्षांपासून शेतात काहीच पिकत नाही. यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडणार कुंटुबाचा उदनिर्वाह कसा चालवणार याच विवंचनेत ते कायम असायचे. दरम्यान गुरुवारी सकाळी कामानिमित्त म्हणून ते पाथरी येथे आले. येथे त्यांनी विषारी द्रव्याची बाटली विकत घेतली व सायंकाळी परत घरी परत आले. यानंतर रात्री त्यांनी सोबतचे विषारी द्रव्य प्राशन केले. यासोबतच त्यांनी कुटुंबियांना व जवळच्या नातलगांना फोनकरून याची कल्पना दिली. याबाबत ग्रामस्थानां माहिती मिळताच त्यांनी कोळे यांना रात्रीतून पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी व आई असा परिवार आहे. याप्रकरणी कोल्हे यांचे चुलत भाऊ विकास कोल्हे यांच्या माहितीवरून पाथरी पोलीस स्थानकात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीagricultureशेती