शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

परभणी जिल्ह्यात फरदडमुक्त अभियान कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:04 IST

कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विभागाने राबविलेले फरदडमुक्त गाव अभियान कागदावरच असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील केवळ २ गावांमध्ये ७० ते ८० टक्के अभियान यशस्वी झाल्याचे कृषी विभागाचेच म्हणणे असल्याने उर्वरित गावांमध्ये या अभियानाचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विभागाने राबविलेले फरदडमुक्त गाव अभियान कागदावरच असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील केवळ २ गावांमध्ये ७० ते ८० टक्के अभियान यशस्वी झाल्याचे कृषी विभागाचेच म्हणणे असल्याने उर्वरित गावांमध्ये या अभियानाचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.कापूस हे जिल्ह्यातील नगदी पीक म्हणून ओळखले जाते. सर्वच शेतकरी कापसाची लागवड करतात. मात्र दोन वर्षांपासून कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव उद्भवत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. २०१७ च्या हंगामात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला.१ ते २ वेचण्या झाल्यानंतर कापसाच्या झाडाला पाने, फुले लागत नव्हती. त्यामुळे सर्वच पीक बोंडअळीच्या प्रादूर्भावाने वाळून जात होते. २०१८ च्या हंगामातही हीच परिस्थिती निर्माण झाली. ज्या शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन घेतले, त्यापैकी बहुतांश शेतकºयांच्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला.बोंडअळीचे कायमस्वरुपी उच्चाटन करण्यासाठी कापसाचे पºहाटी उपटून काढणे हा शास्त्रोक्त पर्याय असून कृषी विभागाने यासाठी विशेष अभियान राबविले. गावा-गावात जावून कापूस पिकातील फरदड उपटून काढण्याची मोहीम राबविली.यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अपेक्षित होते. कृषी विभागातील अधिकाºयांनी गावा-गावात जाऊन शेतकºयांना या अभियानाचे महत्त्व पटवून दिले असते तर मोठ्या प्रमाणात गावे फरदडमुक्त झाली असती. मात्र हे अभियान कागदोपत्रीच राबविल्याने अनेक गावांमध्ये फरदडमुक्ती झाली नाही. त्यामुळे पुढील वर्षीच्या हंगामातही बोंडअळीचा प्रादुर्भाव उद्भवण्याचा धोका कायम असल्याचे दिसत आहे.१५ हजार हेक्टरवरच नवीन पिकेकृषी विभागाने १४ नोव्हेंबर २०१८ पासून फरदडमुक्त गाव अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर या अभियानाचा लेखाजोखा देणारी माहिती कृषी विभागाने तयार केली आहे. जिल्ह्यामध्ये १ लाख ९९ हजार ८६९ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड झाली होती. त्यातील १ लाख ७० हजार हेक्टर कोरडवाहू तर १९ हजार ८६९ हेक्टर बागायती पिकामध्ये मोडते. कापसाची लागवड १ लाख हेक्टरवर झाली असली तरी प्रत्यक्षात कापूस फरदड काढल्याने रिकाम्या झालेल्या केवळ १५ हजार हेक्टरवर रब्बी हंगामामध्ये हरभरा, ज्वारीची लागवड करण्यात आली. तर परभणी तालुक्यातील सूरपिंपरी आणि सोन्ना ही दोनच गावे ७० ते ८० टक्के फरदडमुक्त केल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. त्यामुळे इतर गावांमध्ये राबविलेल्या मोहिमेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.घडी पत्रिकांतून जनजागृतीबोंडअळीचा प्रश्न गंभीर असतानाही प्रत्यक्ष शेतावर जावून जनजागृती झाली नाही. शेतकºयांना फरदडमुक्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी कृषी विभागातील तज्ज्ञांनी शेतकºयांशी संवाद साधणे अपेक्षित होते.मात्र केवळ घडी पत्रिकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. सुमारे ५ हजार घडीपत्रिका जिल्ह्यामध्ये वाटप केल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात गावोगावी जावून फरदडमुक्ती केली असती तर बोंडअडळीचा धोका कमी झाला असता; परंतु, कागदोपत्री अभियान राबविल्याने पुढील वर्षीच्या हंगामातही बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्याची भिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीcottonकापूस