शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मानवत तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांचे प्रशासनाकडून सर्वेक्षण पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 18:14 IST

मानवत तालुक्यातील ४९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचा तालुका प्रशासनाच्या वतीने विविध मुद्यांवर सर्वे केला असून या माहितीचे संकलन पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देमानवत तालुक्यात २०१२ ते २०१७ या कालावधीत ४९ शेतक-यांंनी आत्महत्या केल्याची नोंद महसूल विभागाकडे आहे. आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या नोंदीप्रमाणे कुटुंबियांच्या भेटी घेऊन त्यांचा दर्जा सुधारावा, यासाठी विविध प्रकारची माहिती प्रपत्राद्वारे भरून घेण्यात आली.

परभणी:  मानवत तालुक्यातील ४९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचा तालुका प्रशासनाच्या वतीने विविध मुद्यांवर सर्वे केला असून या माहितीचे संकलन पूर्ण झाले आहे. ही माहिती आॅनलाईन भरण्याचे काम सुरू झाले आहे. मानवत तालुक्यात २०१२ ते २०१७ या कालावधीत ४९ शेतक-यांंनी आत्महत्या केल्याची नोंद महसूल विभागाकडे आहे. सततची नापिकी व कर्ज कसे फेडावे? या विवंचनेतून शेतक-यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. यामुळे आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. 

शासनाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुुुंबियांची भेट घेऊन संवाद साधण्याचे काम १५ नोव्हेंबरपासून हाती घेण्यात आले होते. आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या नोंदीप्रमाणे कुटुंबियांच्या भेटी घेऊन त्यांचा दर्जा सुधारावा, यासाठी विविध प्रकारची माहिती प्रपत्राद्वारे भरून घेण्यात आली. यामध्ये माहिती देणाºयाचे नाव शासनाकडून मदत मिळाली किंवा नाही, किंवा आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे शिक्षण आदी प्रकारची माहिती या प्रपत्राद्वारे घेण्यात आली. तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर, शेततळे, फळबाग लागवड, निर्मल स्वच्छतागृह, अंकूर रोपवाटिका, बळीराजा चेतना अभियानांतर्गत मिळालेल्या लाभाची माहिती प्रशासनाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना विचारण्यात येत होती़ शिवाय  शेतीपासूनचे उत्पन्न, अन्य साधणे, कर्ज, सावकाराचे कर्ज, वीज जोडणी आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.  

या माहितीचे संकलक पूर्ण झाले असून तहसील कार्यालयात सादर करण्यात आले आहे़ जमा केलेली माहिती शासनाच्या  वेबपोर्टलवर भरली जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा, प्राधान्यक्रम आदींचा विचार करून तसा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहेत. शासनाच्या पशू संवर्धन विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना शेतकरी कुटूंबियांना प्राधान्य देण्याचा विचार शासन करीत असल्याची माहिती अधिका-यांनी दिली.

‘तालुक्यातील ४९ आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना भेटी देऊन माहिती संकलित करण्यात आली. ही माहिती आॅनलाईन भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती तहसीलदार अश्विनी जाधव यांनी दिली़

१५० कर्मचा-यांची नियुक्तीतालुकाभरातील ४९ शेतक-यांनी २०१२ ते २०१७ या कालावधीत आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध योजना राबविण्याच्या विचारात शासन आहे. त्यामुळे तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी १५० अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये तहसीलदार अश्विनी जाधव, गटविकास अधिकारी एस.ए. छडीदार, तालुका कृषी अधिकारी माळी, नायब तहसीलदार नकूल वाघुंडे,  मोहम्मद वसीम आदींचा समावेश होता. एकाच वेळी हे सर्व अधिकारी नेमून दिलेल्या गावांमध्ये गेले होते. ​

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याGovernmentसरकार