शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
2
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
4
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
5
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
6
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
7
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
8
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
9
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
10
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
11
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
12
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
13
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
14
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
15
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
16
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
17
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
18
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
19
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
20
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे

खळबळजनक! खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी रिंधा गँगला ३ कोटींची सुपारी

By ज्ञानेश्वर भाले | Published: March 25, 2023 12:13 PM

दुसऱ्यांदा जीवे मारण्यासाठी सुपारी देण्यात आल्याची माहिती स्वतः खा. संजय जाधव यांनी दिली.

परभणी :शिवसेना ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी दोन वर्षांपूर्वी नांदेडच्या रिंधा टोळीकडून त्यांना जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याची माहिती पुढे आली असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दलाकडून त्यांना सुरक्षारक्षक पुरवण्यात आला आहे.

खासदार संजय जाधव यांना गेल्या काही वर्षांपासून अशा धमक्यांचे फोन व जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. सध्या त्यांना परभणीतून कुणीतरी रिंधा टोळीच्या माध्यमातून जीवे मारण्याची सुपारी दिल्याची माहिती खासदार संजय जाधव यांनी लोकमतशी बोलताना दिली. गेल्या ३० वर्षापासून मी सक्रिय राजकारणात आहे. प्रत्येकी दोनदा आमदार व खासदार म्हणून माझी जिल्ह्यात लोकप्रियता आहे. शिवसेना ठाकरे कुटुंबीयांशी मी एकनिष्ठ असून या बदलत्या परिस्थिती सुद्धा त्यांच्यासोबत उभा आहे. जाधव यांना जीवे मारण्यासाठी तीन कोटीची सुपारी देण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून समोर आली आहे. माझ्या जिवाला धोका असून मला सुरक्षारक्षक पुरवावा, अशी मागणी खासदार जाधव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

परभणीतूनच सुपारी दिल्याची माहितीमाझे कुणाशीही राजकीय हाडवैर नाही, मी एक सच्चा शिवसैनिक असून जनतेच्या सेवेसाठी गेल्या ३० वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. मला जीवे मारण्यासंदर्भात परभणीतूनच कोणीतरी नांदेडच्या रिंधा टोळीला सुपारी दिल्याची माहिती असून याचा पोलीस प्रशासनासह राज्याच्या गृह विभागाने उलगडा करावा. - संजय जाधव, खासदार

सुरक्षा दिली आहे खासदार संजय जाधव यांच्या मागणीनुसार आम्ही त्यांना सुरक्षारक्षक पुरवली आहे. त्यांना जीवे मारण्याच्या धमकीसंदर्भात कोणीतरी सुपारी दिल्याचे माहिती पुढे येत आहे. त्यांच्या मागणीनुसार आम्ही त्याला आवश्यक तो सुरक्षारक्षक दिला आहे.- रागसुद्धा. आर, जिल्हा पोलीस अधीक्षक

टॅग्स :Sanjay Jadhavसंजय जाधवparabhaniपरभणीShiv Senaशिवसेना