शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

परभणीत कापसाला दुष्काळी फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:40 IST

जिल्ह्यातील दुष्काळाचा फटका कापसाच्या बाजारपेठेला बसला असून, आवक होत नसल्याने जिनिंग प्रेसिंग व्यापारी चिंतेत आहेत़ मागील दोन वर्र्षांची तुलना करता यावर्षी सुमारे २० हजार मे़ टनाने कापसाची आवक घटली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळाचा फटका कापसाच्या बाजारपेठेला बसला असून, आवक होत नसल्याने जिनिंग प्रेसिंग व्यापारी चिंतेत आहेत़ मागील दोन वर्र्षांची तुलना करता यावर्षी सुमारे २० हजार मे़ टनाने कापसाची आवक घटली आहे़खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन ही दोन नगदी पिके म्हणून ओळखली जातात़ शेतकरी कापसाच्या लागवडीवर भर देतो़ इतर पिकांच्या तुलनेत कापूस उत्पादनातून लवकर पैसा मोकळा होत असल्याने पांढरं सोनं म्हणून या कापसाकडे पाहिले जाते़ मात्र यावर्षी कापसानेही शेतकऱ्यांना दगा दिला आहे़ मागील वर्षी जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावरील कापूस बोंडअळीने बाधित झाला होता़परिणामी उत्पन्नात घट झाली़ यावर्षी देखील शेतकºयांनी धोका पत्कारून कापसाची लागवड केली़ काही भागात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत असला तरी सर्वाधिक फटका बसला तो परतीच्या पावसाचा. पाऊस वेळेवर न झाल्याने कापसाची वाढ खुंटली़ सर्वसाधारणपणे एक ते दोन वेचण्यातूनच शेतकºयांना कापसाचे उत्पादन मिळाले आहे़नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यामध्ये कापूस विक्रीसाठी दाखल झाला आहे; परंतु, मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी कापसाची आवक घटल्याने व्यापारी चिंतेत आहेत़ परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत १३१ गावांमधील कृषी मालाची खरेदी-विक्री होते़ कापूस खरेदीतून बाजार समितीला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते़ मात्र यावर्षी बाजार समिती अंतर्गत आवक घटली आहे़२०१६-१७ मध्ये परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत डिसेंबर अखेरपर्यंत सुमारे ६६ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती़ तर मागीलवर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव असतानाही ५८ हजार क्विंटल कापूस बाजार समितीत डिसेंबर महिन्यापर्यंत दाखल झाला होता़ यावर्षी मात्र डिसेंबर अखेर केवळ ४० हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे़ सर्वसाधारपणे ५ हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव कापसाला मिळत असतानाही आवक मात्र घटली आहे़ मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी तब्बल २० हजार क्विंटल कापूस कमी विक्रीसाठी आला़ त्याचा परिणाम बाजार समितीच्या उत्पन्नावर झाला असून, जिनिंग, प्रेसिंग व्यवसायिकही आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत़ जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमध्ये एकीकडे कृषी बाजारपेठ ठप्प असताना दुसरीकडे जिनिंग व्यावसायिकांनाही फटका सहन करावा लागत आहे़ई-नामचा कापूस विक्रीवर अडथळापरभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नाम प्रणाली लागू झाली आहे़ या प्रणाली अंतर्गत बाजार समितीत येणाºया प्रत्येक मालाची खरेदी-विक्री आॅनलाईन पद्धतीने केली जाते़ खरेदी केलेल्या मालाचे पेमेंटही थेट शेतकºयाच्या खात्यावर जमा होते़ यासाठी सर्वसाधारणपणे आठ दिवसांचा काळ लागतो़ शेतीमालाची विक्री झाल्यानंतर थेट हातामध्ये रोख पैसे मिळावेत, अशी शेतकºयांची भावना असते़ परंतु, परभणी बाजार समितीत शेत माल विक्री केल्यानंतर त्याचे पेमेंट आठ दिवसांनी होत असल्याने शेतकरी ई-नाम प्रणालीतून माल विक्री करण्याऐवजी खाजगी व्यापाºयांना किंवा ज्या बाजार समितीत ई-नाम प्र्रणाली नाही, तेथे शेतमाल विक्री करीत आहेत़ परभणी बाजार समितीच्या अंतर्गत असलेल्या अनेक कापूस उत्पादकांनी मानवत येथील बाजार समितीत कापसाची विक्री केली़ त्याचाही फटका परभणी बाजार समितीला बसला आहे़भाव कमी मिळत असल्याचा परिणामदुष्काळी परिस्थितीबरोबरच परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांनी या बाजार समितीकडे पाठ फिरविली आहे़ मानवतसह जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये कापसाला किमान १०० रुपये जास्तीचा भाव मिळत असल्याने कापूस उत्पादकांनी ज्या ठिकाणी अधिक भाव आहे तेथे कापूस विक्री करणे पसंत केले़ परिणामी बाजार समितीच्या उत्पन्नात घट झाली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरीdroughtदुष्काळ