शहरं
Join us  
Trending Stories
1
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
2
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दिपक केसरकरांची सारवासारव
3
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
4
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
5
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
6
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
7
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
8
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?
9
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
10
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
11
Viral Video : व्वा! काय आयडिया आहे... मित्र फिरायला गेले अन् बिझनेस सुरू करून आले! होतंय कौतुक
12
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
13
IND W vs SA W: भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना ठरणार 'ऐतिहासिक'!
14
PhysicsWallah IPO: पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
15
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
16
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
17
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
18
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
20
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....

डॉ. अमोल कोल्हेंची फडणवीसांवर जोरदार टीका; मुख्यमंत्री MBA आहेत, याचा पूर्ण अर्थ असा की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 15:41 IST

मग मुख्यमंत्री कुणावर ३०२ चा गुन्हा कुणावर दाखल करायचा?

पाथरी - कामंच केली नाही म्हणून महाजनादेश यात्रेत पोलिस बंदोबस्त ठेवावा लागत आहे. मुख्यमंत्री एमबीए आहेत. त्यांच्या पदवीचा आदर करुन सांगतो आज ती पदवी म्हणजे 'महाबोलबच्चन यात्रा' झाली आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

पाथरीच्या जाहीर सभेत त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली, अमोल कोल्हे म्हणाले की, १६ हजार भगिनींच्या कपाळावरचे कुंकु पुसले गेले आहे मग मुख्यमंत्री कुणावर ३०२ चा गुन्हा कुणावर दाखल करायचा असा सवाल करत प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने सरकारने पुसलीय अशी टीका त्यांनी केली. 

प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करतंय.त्यांना शेतकऱ्यांच्या भावनेचं काहीही देणेघेणे नाही. आज आपण सुपात आहोत उद्या मंदीमुळे जात्यात जाणार आहोत हे लक्षात घ्या असे आवाहनही डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. तसेच सरकारच्या विरोधात कोण बोलायला कोण लागलं की लगेच सीबीआय, ईडीचा घडीबुवा अंगावर सोडला जातोय. सध्या हुकुमशाही सुरु आहे हे लक्षात घ्या असा इशाराही कोल्हेंनी दिला. 

पुढेही मीच 'चालू मुख्यमंत्री' राहणार हे सांगण्यासाठी महाजनादेश आत्ताही मी चालू मुख्यमंत्री आहे आणि पुढेही मीच चालू मुख्यमंत्री राहणार हे सांगण्यासाठी महाजनादेश यात्रा मुख्यमंत्री काढत आहेत अशी जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याच सभेत केली.  सत्तेत आल्यावर लगेच कर्जमाफी करतो असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले होते परंतु ही फसवी योजना निघाली आहे. शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. फसवी कर्जमाफी जाहीर करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्याच्या घरात फूट पाडणारा अनाजी पंत होता आणि आताही दोन छत्रपतींचा घरात फुट कुणी पाडली तर फडणवीस असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस