शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
2
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
3
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
4
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
5
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 LIVE: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता, अजित पवार विरोधी बाकावर
6
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
7
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
8
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
9
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
10
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
11
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
12
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
13
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
14
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
15
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
16
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
17
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
18
'ट्रम्प' धोरणांचा दुहेरी फटका! व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये होणाऱ्या विलंबामुळे भारतीयांना नोकऱ्या जाण्याची भीती
19
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:08 IST

या वादादरम्यान खासदार संजय जाधव यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या शहरातील फिरण्यावरही प्रश्न उपस्थित केला.

- मारोती जुंबडे परभणी : परभणी शहर महानगरपालिकेच्या १६ प्रभागांतील ६५ नगरसेवकांसाठी गुरुवारी सकाळी ७.३० वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. मात्र, मतदानाच्या पहिल्याच काही तासांत राजकीय आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक वाद आणि उमेदवारांतील बाचाबाचीमुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले. मतदानादरम्यान खासदार संजय जाधव आणि मतदान निरीक्षक मेघना कवाली यांच्यात शाब्दिक वाद झाला. 

प्राथमिक माहिती अशी की, मतदान निरीक्षक मेघना कवाली यांनी खासदार जाधव हे मतदानासाठी माणसे घेऊन आल्याची तक्रार पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्याकडे केल्याचे समजताच खासदार जाधव संतापले. मी मतदानासाठी आलो आहे. कोणतेही कारण नसताना माझी तक्रार एसपींकडे करता. भाजपाच्या तालावर काम न करता सध्याची खरी परिस्थिती समोर आणा, असे म्हणत त्यांनी मतदान निरीक्षकांना सुनावले आणि तेथून निघून गेले. या प्रकारामुळे काही काळ संबंधित मतदान केंद्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पालकमंत्र्यांच्या फिरण्यावर प्रश्नचिन्हया वादादरम्यान खासदार संजय जाधव यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या शहरातील फिरण्यावरही प्रश्न उपस्थित केला. मी शहराचा मतदार आहे. माझ्यासोबत कुटुंब असताना माझी तक्रार केली जाते; मात्र पालकमंत्री या शहराच्या मतदार नाहीत, तरीही त्या मतदान केंद्रांवर पाहणी करत आहेत. त्यांना केंद्रावर येण्याची परवानगी कोणी दिली? असा सवाल खासदार जाधव यांनी उपस्थित केला. एकीकडे मतदान प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे या घडामोडींमुळे निवडणूक वातावरणाला तणावाची किनार लागली असून, प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहेत.

राष्ट्रवादी-कॉग्रेस उमेदवारांमध्ये बाचाबाचीदरम्यान, शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील मोमीनपुरा भागात काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच पोलीस प्रशासनाने तातडीने धाव घेतली. सध्या त्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय, पारवा गेट नाका परिसरातही दोन उमेदवारांमध्ये वाद झाला. या घटनेनंतर निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून हस्तक्षेप करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: MP Sanjay Jadhav clashes with election observer during voting.

Web Summary : Voting in Parbhani saw clashes between MP Sanjay Jadhav and an election observer. Arguments also erupted between candidates in different areas, leading to police intervention to maintain order during the tense election.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक २०२६sanjay jadhav ubtसंजय जाधव