शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांशी बेइमानी! दीडकोटींच्या विकास निधीचा अपहार; सरपंचासह पती, ग्रामसेवकावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 14:14 IST

गावासाठी आलेल्या दीड कोटींचा अपहार; सरपंचासह पती, ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

मानवत (जि. परभणी) : शासनाकडून वेगवेगळ्या योजनांत मिळालेल्या एक कोटी ४१ लाख रुपयांचे संगनमत करून अपहार केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कुंभारी ग्रामपंचायतीचे सरपंच, त्यांचे पती व ग्रामसेवक या तिघांविरुद्ध शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुक्यातील वांगी-कुंभारी ग्रामपंचायतीच्या सरपंच नीता नंदकुमार चौधरी, त्यांचे पती नंदकुमार चौधरी व ग्रामसेवक मन्नथ साखरे यांनी संगनमत करून फेब्रुवारी २०२१ पासून ते आजतागायत शासकीय निधीतून अपहार केला. वांगी-कुंभारी ग्रामपंचायतीचे शासनाकडून वेगवेगळ्या योजनांत एक कोटी ४१ लाख एवढी रक्कम प्राप्त झाली असून, सरपंच नीता चौधरी यांच्याऐवजी नंदकुमार चौधरी हेच सह्या करतात. त्याद्वारे त्यांनी अनेक नियमबाह्य कामे केली आहेत. कागदपत्रांवर दाखवलेल्या खर्चाच्या प्रत्यक्ष चांगल्या प्रतीची कामे केलेली नाहीत. या संदर्भात गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्याकडे वारंवार लेखी तक्रार दाखल करण्यात आल्या; परंतु, या तक्रारीची गांभीर्यपूर्वक दखल घेण्यात आली नाही, असे फिर्यादीत म्हटले होते.

गुन्हा दाखल करण्याचे आदेशमानवत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली. प्रकरणात सुनावणीत वांगी-कुंभारी ग्रामपंचायतीचे शासनाकडून वेगवेगळ्या योजनांत १ कोटी ४१ लाख एवढी रक्कम प्राप्त झाली. प्रकरणात वांगी-कुंभारी ग्रामपंचायतीचे सरपंच, त्यांचे पती व ग्रामसेवक यांनी संगनमत करून शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश मानवत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी जी. ए. करजकर यांनी दिले होते. यानुसार राधाकृष्ण मुळे यांच्या तक्रारीवरून सरपंच नीता चौधरी, त्यांचे पती नंदकुमार चौधरी आणि ग्रामसेवक मन्मथ साखरे यांच्याविरुद्ध १८ जानेवारीला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीparabhaniपरभणी