शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाज आरक्षण: परभणी जिल्ह्यात सेलू, गंगाखेडमध्ये आज बंद, पाथरीत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:04 IST

धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी १३ आॅगस्ट रोजी गंगाखेड, सेलू येथे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पाथरी तालुक्यात मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे. परभणी येथेही निवेदन दिले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी १३ आॅगस्ट रोजी गंगाखेड, सेलू येथे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पाथरी तालुक्यात मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे. परभणी येथेही निवेदन दिले जाणार आहे.गंगाखेड येथे १३ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास खंडोबा मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढली जाणार आहे. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन दिले जाईल. धनगर समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. गंगाखेड तालुक्यात सोमवारी बंद पाळला जाणार आहे. व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जितेश गोरे, भाऊसाहेब कुकडे, नारायण घनवटे, जयदेव मिसे, भगवान बंडगर, रुखमाजी लवटे आदींनी केले आहे. तसेच सेलूत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पूर्णा येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे.पाथरीत आज मोर्चापाथरी तालुक्यात मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले जाणार आहे. सोमवारी सकाळी १० वाजता शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातून हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे. मोर्चाच्या आयोजनासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी राजे मल्हार मित्र मंडळाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव पितळे, उद्धवराव श्रावणे, माजी नगरसेवक नारायणराव पितळे, राधाकिशन डुकरे, अ‍ॅड.रोकडे आदींची उपस्थिती होती.परभणीत देणार निवेदनधनगर समाजाला एस.टी. प्रवर्गात समाविष्ट करावे, या मागणीसाठी परभणी येथे तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे. यावेळी धनगर समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीreservationआरक्षणagitationआंदोलन