शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाकडून युती सरकारच्या आरक्षण वचननाम्याची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 13:48 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युती सरकारच्या वचननाम्याची होळी करुन आपला निषेध व्यक्त केला. 

परभणी : येथील धनगर समाज संघर्ष समिती व समाज बांधवांच्या वतीने धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी ३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युती सरकारच्या वचननाम्याची होळी करुन आपला निषेध व्यक्त केला. 

राज्य शासनाला धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतचा टीसचा अहवाल तीन महिन्यापासून प्राप्त झाला; परंतु, याबाबत राज्यशासन कोणतीही भूमिका घेत नसल्यामुळे धनगर समाज संतप्त झाला आहे. त्यामुळे डिसेंबर अखेर राज्य शासनाने धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील धनगर समाज बांधव सोमवारी जिल्हाधिकारी परिसरात सकाळी ११ वाजेच्या सुमारास जमा झाला. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीवेळी धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात युती सरकारच्या जाहीर नाम्यात उल्लेख करण्यात आला होता.या जाहीरनाम्याची धनगर समाज बांधवांच्या वतीने होळी करण्यात आली.

त्यानंतर सरकारविरोधी घोषणा देऊन अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर अ‍ॅड.हरिभाऊ शेळके, विठ्ठलराव रबदडे, मारोतराव बनसोडे, सुरेश भूमरे, अनंत बनसोडे, राजेश देवकते, भागवत बाजगीर, विजय घोरपडे, अशोक मुळे, संगिताताई जगाडे, सीताताई बालटकर, बालाजी वैद्य, लक्ष्मण लांडे, अर्जून ढेंबरे, नारायण घनवटे, प्रभाकर जगाडे, गंगाधर डुकरे, विष्णू बोरचाटे, कैलास खनपटे, बाळासाहेब ढोले, भारत आव्हाड, प्रसाद लेंगुळे, रामदास आबूज यांच्यासह धनगर समाज बांधवांच्या स्वाक्षºया आहेत. दरम्यान, या आंदोलनास जिल्ह्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :reservationआरक्षणagitationआंदोलनparabhaniपरभणीzpजिल्हा परिषद