शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

देवेंद्र फडणविसांनी ऑफ नव्हे ऑन कॅमेरा बोलावं; सुप्रिया सुळे यांचा प्रतिहल्ला

By ज्ञानेश्वर भाले | Updated: February 14, 2023 17:04 IST

राज्यातील राजकारण सध्या वेगळ्या वळणावर जात आहे. पवारांवर टीका केल्याशिवाय चर्चेत राहता येत नाही, असे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

परभणी : गेल्या काही दिवसापासून राज्यात सूडबुद्धीचे राजकारण पेरल्या जात असून बड्या नेत्यांकडून कटकारस्थाने रचली जात आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कल्पना होती, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केले आहे. परंतु त्यांचे हे वक्तव्य ऑफ कॅमेरा असल्याची चित्रफिती पुढे आल्याने त्यांनी ऑफ नव्हे तर ऑन कॅमेराच बोलावं, असा प्रतिहल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर परभणीतील मंगळवारी झालेल्या पत्रपरिषदेत केला. 

राज्यातील राजकारण सध्या वेगळ्या वळणावर जात आहे. पवारांवर टीका केल्याशिवाय चर्चेत राहता येत नाही, असे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस राज्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडून पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करत आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पहाटेच्या शपथविधीसाठी शरद पवार यांची संमती होती, असे वक्तव्य केले आहे. परंतु या वक्तव्याचे चित्रफिती पाहिली असता त्यात त्यांनी हे मी ऑफ कॅमेरा सांगतोय, असे दिसून येत असल्याचे सुप्रिया सुळे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे फडणवीस यांनी ऑफ कॅमेरा बोलण्यापेक्षा ऑन कॅमेरा जे काही असेल ते सत्य बोलावे आणि राज्याला खरी काय ती परिस्थिती सांगावी, असे आव्हान त्यांनी फडणवीसांना दिले. 

सुसंस्कृतपणा घालवलादेवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुसंस्कृतपणा आणि विकासात्मक चेहरा म्हणून आम्ही पाहत होतो. परंतु अलीकडच्या काळात त्यांची प्रतिमा पूर्णतः बदलली आहे. विकासात्मक बाबीवर चर्चा, वादविवाद होणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या काही दिवसापासून सूडबुद्धीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राच्या विकासाची वाताहत होत असल्याचा आरोप सुळे यांनी फडणवीस यांच्यावर केला.

घोषणांचा पाऊस, निधीचा दुष्काळकेंद्र सरकारने नुकतीच बजेटची मांडणी केली. यात नागरिकांसाठी विविध घोषणांचा पाऊस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाडला. परंतु त्या योजना प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यासाठी लागणाऱ्या बजेटची तरतूदच केली नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे घोषणा केल्या मात्र त्याची पूर्तता होणार नसल्याची स्थिती आहे.

सरकारकडून सूडाच्या राजकारणाला खतपाणीगेल्या काही दिवसापासून केंद्र आणि राज्य सरकार सूडाच्या राजकारणाला खतपाणी घातले जात आहे. विकासात्मक बाबीला बाजूला ठेवून सत्ता समीकरणाची गणिते जुळवली जात असल्याने केंद्र आणि राज्य सरकारकडून नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सर्व सामन्यांचे प्रश्न, समस्या, बेरोजगारी यावर बोलायला सरकारला वेळ नाही. महागाईचा उच्चांक १०.१ वर पोहोचला असून गेल्या दहा वर्षात महागाईने उच्चांक गाठला आहे. ईडी  (शिंदे-फडणवरस) सरकार विकासात्मक मुद्दे बाजुला ठेऊन सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप सुळे यांनी पत्रपरिषदेत केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाparabhaniपरभणी