भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेस महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदीप तांदळे, रामकिशन रौंदळे, एन.डी.देशमुख, भालचंद्र गोरे, दिनेश नरवाडकर, प्रशांत सांगळे यांची उपस्थिती होती. यावेळी भरोसे म्हणाले, ओबीसींना हक्काच्या आरक्षणापासून वंचित ठेवून महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजावर अन्याय केला आहे. या अन्यायास आघाडी सरकार जबाबदार असून याचा भाजपतर्फे निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी जिल्ह्यातील सर्व मंडळांमध्ये आंदोलन केले जाणार आहे. इंम्पेरिकल डाटा एकत्रित करण्याचे काम आजपर्यंत या सरकारने केलेले नाही. तसेच राज्य मागास आयोगाचे गठण केल्यानंतर या आयोगास आवश्यक असणारे मनुष्यबळ व आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली नाही. यामुळे इंम्पेरिकल डाटा एकत्रित करण्याचे काम रखडले आहे. याचा निषेध भाजपतर्फे केला जाणार आहे.
भाजपच्या वतीने जिल्हाभरात आज धरणे, निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:22 IST