रामपुरीत सेंद्रिय खत निर्मितीचे प्रात्याक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:23 AM2021-02-26T04:23:14+5:302021-02-26T04:23:14+5:30

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझे गाव सुंदर गाव’ या उपक्रमांतर्गत २४ फेब्रुवारी रोजी रामपुरी ...

Demonstration of organic manure production in Rampur | रामपुरीत सेंद्रिय खत निर्मितीचे प्रात्याक्षिक

रामपुरीत सेंद्रिय खत निर्मितीचे प्रात्याक्षिक

Next

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझे गाव सुंदर गाव’ या उपक्रमांतर्गत २४ फेब्रुवारी रोजी रामपुरी बु. येथे सेंद्रिय खत निर्मिती प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण परिषद सदस्य कृषीभूषण शिवराम घोडके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. घोडके यांनी सांगितले, कामधेनू सिद्धी- ३ या औषधीच्या मदतीने आणि नाममात्र सेवा शुल्क आकारून जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या उकिरड्यातून सेंद्रिय खतांची निर्मिती करता येऊ शकते. या पद्धतीतून खताची निर्मिती कशा पद्धती करावी, त्यासाठी किती कालावधी लागतो आणि खत निर्मितीतून काय फायदे होतात, याविषयीची माहिती घोडके यांनी शेतकऱ्यांना दिली. अशा पद्धतीने सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिकांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तूबाकले यांनी केले आहे.

Web Title: Demonstration of organic manure production in Rampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.