शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणानंतर मृत झालेल्या बालकाचा पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी काढला बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 13:59 IST

लसीकरणानंतर मृत झालेल्या बालकाचा पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी शुक्रवारी(दि.९) रात्री बाहेर काढण्यात आला.

गंगाखेड (परभणी ) : लसीकरणानंतर मृत झालेल्या बालकाचा पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी शुक्रवारी(दि.९) रात्री बाहेर काढण्यात आला. या मृतदेहाचे अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. 

रोकडेवाडी (ता.पालम) येथील अंगणवाडीमध्ये बुधवारी (दि. ६) झालेल्या लसीकरणा नंतर दुसऱ्या दिवशी (दि. ७) दोन बालके दगावली होती. यातील राधाकृष्ण गोपाळ सकनुर या बालकाचा पुरलेला मृतदेह त्याच्या पित्याने दिलेल्या तक्रारी अर्जावरून शुक्रवारी (दि. ९) रात्री  शवविच्छेदनासाठी बाहेर काढण्यात आला. या मृतदेहाचे अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात येणार आहे. यासोबतच राम निळे या बालकाच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण : पालम तालुक्यातील रोकडेवाडी येथे मंगळवारी (दि. ६) दुपारी बारा वाजेच्या सुमारास रावराजुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका बी.डी. निलेवाड यांनी रोकडेवाडी येथील अंगणवाडीत राम व्यंकटी निळे व लक्ष्मण व्यंकटी निळे ( वय एक महिना ) या दोन जुळ्या भावांना बीसीजी व पोलीओ, राधाकृष्ण गोपाळ सकनुर वय चार महिने यास पेंटावन, पोलीओ व बीसीजी, विद्या दत्तराव मखणे (वय दीड वर्ष) हिस डीपीटी बूस्टर, पोलीओ तसेच व्हिटॅमिन ए. ही लस दिली.

यातील राधाकृष्ण गोपाळ सकनुर वय चार महिने यास मंगळवारी मध्यरात्री पासुन ताप आल्याने त्याच्या पालकांनी बुधवारी (दि. ७) पहाटे त्यास परळी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषीत केले. याच दरम्यान गावातील राम व्यंकटी निळे व लक्ष्मण व्यंकटी निळे वय एक महिना या दोन जुळ्या भावांपैकी राम निळे याची प्रकृती खालावली. दोघांनाही बुधवारी दुपारी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता यातील राम निळे यास डॉक्टरांनी मयत घोषीत केले. यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली. 

टॅग्स :Deathमृत्यूhospitalहॉस्पिटलparabhaniपरभणीPoliceपोलिसMedicalवैद्यकीय