शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील जिल्हा रुग्णालयात कैद्याचा उपचारा दरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 19:13 IST

दोन वर्षापूर्वी एका फसवणूक प्रकरणामध्ये सुग्रीव गायकवाड यांना अटक झाली होती.

ठळक मुद्दे कैद्यास मागील काही महिन्यांपासून विविध आजारांचा त्रास होत होता त्यामुळे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारही सुरु होते.

परभणी- येथील जिल्हा कारागृहातील एका कैद्याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आज  सायंकाळी ४.१५ वाजेच्या सुमारास घडली.

सुग्रीव गोपाळराव गायकवाड (६०) असे मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव असून फसवणूक प्रकरणामध्ये तो शिक्षा भोगत होता, अशी माहिती मिळाली. येथील जिल्हा कारागृहातील सुग्रीव गोपाळराव गायकवाड या कैद्यास मागील काही महिन्यांपासून विविध आजारांचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारही सुरु होते.

आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहात झालेल्या राऊंडमध्ये सुग्रीव गायकवाड यांनी त्रास होत असल्याचे नमूद केले. त्यामुळे  गायकवाड यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच सायंकाळी ४.१५ वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. साधारणत: दोन वर्षापूर्वी एका फसवणूक प्रकरणामध्ये सुग्रीव गायकवाड यांना अटक झाली होती. या प्रकरणात ते शिक्षा भोगत होते.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसParabhani civil hospitalजिल्हा रुग्णालय परभणी