शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पिके करपून चालली, प्रशासन निर्णय घेईना; संतप्त शेतकऱ्यांनी स्वतःच सोडले कालव्याचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 18:44 IST

पिके करपून जात असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी जायकवाडी विभागाकडे तातडीने पाणी सोडण्याची मागणी करत जलसमाधी आंदोलन केले होते.

- विठ्ठल भिसेपाथरी : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून हादगाव येथील चारी क्रमांक 49 वर पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी जलसमाधी आंदोलन केले. मात्र प्रशासनाकडून पाणी सोडण्याचा निर्णय झालाच नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी स्वतःच कालव्यातून चारी क्रमांक 49 मध्ये पाणी सोडत करपून जाणाऱ्या पिकांना जीवनदान दिले. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील दुसरे पाणी आवर्तन 28 जानेवारीपासून सोडण्यात आले आहे.  तर पाथरी तालुक्यात 11 फेब्रुवारी पासून पाणी सोडण्यात आले आहे. सध्या पैठण धरणातून डाव्या कालव्यात 800 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. मात्र, पाथरी तालुक्यातील हदगाव येथील चारी क्रमांक 49 मध्ये पाणी सोडण्यात आले नव्हते. पिके करपून जात असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी जायकवाडी विभागाकडे तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र, तांत्रिक अडचणी सांगत पाणी सोडण्यास दिरंगाई करण्यात आल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी गुरुवारी वरखेड हादगाव येथे कालव्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले. आंदोलन स्थळी जायकवाडीच्या उपविभागीय अभियंता भेट दिली घटनास्थळी पाथरीचे पोलीस निरीक्षक ही दाखल झाले पाणी सोडल्याशिवाय आंदोलन स्थगित केले जाणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. 

अखेर शेतकऱ्यांनी स्वतःच सोडले पाणी दरम्यान, आज दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाचा कोणताही अधिकारी इकडे फिरकला नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास स्वतःच डाव्या कालव्यातून चारी क्रमांक 49 मध्ये पाणी सोडून घेतले आहे. 

आठ दिवसांत पाणी सोडणार सध्या डाव्या कालव्यामध्ये पाणी पातळी कमी आहे. पातळी वाढल्यानंतर चारीत पाणी सोडले जाणार आहे. त्यासाठी किमान आठ दिवस लागतील. शेतकऱ्यांनी चारीतून पाणी सोडून घेतले असले तरी बंद करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे चे उपअभियंता पवार यांनी दिली. 

टॅग्स :parabhaniपरभणीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीWaterपाणी