Crime against a medical officer in rape case | परिचारिकेवर बलात्कार प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
परिचारिकेवर बलात्कार प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

जिंतूर (जि़ परभणी) : येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी परिचारिकेस शरीर सुखाची मागणी करून दोन वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तौसिफ हुसेन अन्सारी याच्याविरूद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित परिचारिकेने जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे़ त्यांच्या तक्रारीनुसार वैद्यकीय अधिकारी डॉ़ अन्सारी याने दोन वर्षांपासून शारीरिक व मानसिक त्रास दिला़ तसेच नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली़ लैंगिक शोषण केले़ ४ जून रोजी डॉ़ अन्सारी याने आपल्या कक्षात बोलावून घेतले आणि मला शासकीय निवासस्थान सोडण्याच्या सूचना दिल्या़ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या सततच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे.

येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्राला मागील तीन वर्षांपासून वेगवेगळे पुरस्कार मिळत आहेत़ एकीकडे आदर्श रुग्णालयाचा दर्जा मिळाला असताना दुसरीकडे असे प्रकार होत असून, या प्रकरणाची सक्षम महिला पोलीस अधिकाºयामार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी होत आहे़


Web Title: Crime against a medical officer in rape case
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.