शहरं
Join us  
Trending Stories
1
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
2
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
4
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
5
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
6
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
7
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
8
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
9
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
10
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
11
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
12
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
13
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
14
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
15
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
16
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
17
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
18
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
19
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
20
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

CoronaVirus : धक्कादायक ! जिल्हाबंदी असतानाही ११० जणांचा मानवत तालुक्यात शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 18:58 IST

जिल्हा बंदी असताना देखील शहरात प्रवेश कसा दिला जात आहे असा सवाल शहरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.

मानवत : जिल्हाबंदी असतानादेखील १ एप्रिल ते १६ एप्रिल या दरम्यानच्या काळामध्ये ११० जणांनी  शहराच्या हद्दीत प्रवेश केल्याचे ग्रामीण रुग्णालयात झालेल्या नोंदीवरून समोर आले आहे.यावरून जिल्हा बंदी असताना देखील शहरात प्रवेश कसा दिला जात आहे असा सवाल शहरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात १ एप्रिल २०२०  रोजी ८ जण मुंबई, पुणे ,अजमेर या ठिकाणाहून आले तर २  एप्रिल रोजी पाच जण मुंबई, पुणे ,सातारा या ठिकाणाहून आले अशाच प्रकारे १५ एप्रिल पर्यंत शहरातील व तालुक्यातील हद्दीत साधारणतः ११० जणांनी तालुक्याच्या हद्दीत प्रवेश केला ठिकठिकाणी नाका-बंदी असतानादेखील या लोकांना प्रवेश कसा मिळतो या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळणे अवघड झाले आहे याबाबत तहसील प्रशासन व  पोलिसही बोलत नसल्याचे दिसून येत आहे. 

सेलू तालुक्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी तालुक्यात प्रवेश करणाऱ्या मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यास तालुक्यात प्रवेश नाकारला. ही बातमी सर्व जिल्ह्यात गाजली मात्र तालुक्यात अशी कडक भूमिका घेतली जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे दररोज बाहेरून येणारे लोंढे कमी होत नसल्याचे विदारक चित्र तालुक्यात दिसून येत आहे. या वरिष्ठ प्रशासनाने वेळीच लक्ष घालून योग्य ती कठोर कारवाई करीत तालुक्यातील बाहेरून येणारे लोंढे थांबवावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवावाजिल्ह्यातील  इतर तालुक्यातील पोलीस प्रशासन कडक भूमिका घेऊन त्या त्या शहरात कडक पावले उचलीत आहेत. संचार बंदीचे नियम मोडल्यास नियम मोडणाऱ्या वर गुन्हे दाखल केले जात आहे. मात्र मानवत तालुक्यात गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण अतिशय नगण्य असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर महाराणा प्रताप चौक या एकमेव ठिकाणीच पोलीस बंदोबस्त लावला जात असल्याचे दिसून येत आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या इतर मार्गावर बंदोबस्त लावण्यासाठी पोलीस प्रशासन तसदी घेत नसल्याचे चित्र आहे. पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन शहरात गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी