शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

परभणी महापालिकेत नळ जोडणी प्रक्रियेतून कंत्राटदार हद्दपार; विभागीय आयुक्तांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 20:00 IST

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची कडक भूमिका

ठळक मुद्देमनपा अधिकाऱ्यांना निर्देशअर्धे दर कमी होणार

परभणी : शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या नळ जोडणी दर प्रक्रियेतून थेट कंत्राटदारालाच हद्दपार करुन नागरिकांनीच साहित्य आणावे व मनपाने फक्त अनामत रक्कम घेऊन नळ जोडणी द्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मनपा आयुक्त रमेश पवार यांना दिले आहेत.

शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या नळ जोडणीचे दर निश्चित करण्याच्या संदर्भात प्रारंभीच्या दोन सर्वसाधारण सभेत निर्णय झाला नाही. त्यामुळे उन्हाळ्यातही नव्या योजनेचे पाणी मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मनपा आयुक्त रमेश पवार यांना फोन करुन नागरिकांना परवडेल, अशा दरात तातडीने नळ जोडणी द्या. मोठ्या परिश्रमाने ही योजना पूर्ण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना या योजनेचे पुरेपुर पाणी मिळाले पाहिजे, असे आदेश दिले होते. नंतरच्या काळात आयुक्त केंद्रेकर यांच्या आदेशाचा काही मनपा सदस्यांनी चुकीचा अर्थ काढला व मनपाच्या २७ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत २ हजार रुपये अनामत रक्कम व ९ हजार रुपये खाजगी एजन्सीला नळ जोडणी, मीटर, रस्ता खोदकाम आदींसाठी देण्यास बंधनकारक केले व सदरील दरांना विभागीय आयुक्त केंद्रेकर यांचीच मंजुरी असल्याचा अपप्रचार चालविला गेला. प्रत्यक्षात त्यांचा दर प्रक्रियेत काहीही संबध नव्हता.

याबाबत बुधवारी मनपा आयुक्त पवार यांना पत्रकार परिषदेत  विचारण्यात आले. त्यावेळी पवार यांनी याबाबत आपणास काहीही माहित नसल्याचे सांगितले. त्यांच्या नावाचा दुरुपयोग होत असल्याची बाब केंद्रेकर यांच्यापर्यंत पोहचली. त्यानंतर त्यांनी मनपा आयुक्त पवार यांना गुरुवारी धारेवर धरले व याचा  जाब विचारला. परभणीचे आपण नागरिक आहोत, म्हणून शहराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत, ही आपली भूमिका आहे. त्यामुळेच नळ योजनेच्या पाण्याचा लाभ सर्व नागरिकांना तातडीने मिळाला पाहिजे. नळ जोडणीचे दर सर्वसामान्यांना परवडतील, असेच असावेत, असे त्यांनी सांगितले. नळ जोडणी देण्याचे काम मनपाचे आहे. त्यामुळे यात कंत्राटदाराची काय गरज आहे? नागरिकच नळ जोडणीचे साहित्य घेऊन येतील. मनपाने अधिकृत २० ते २५ प्लंबर नियुक्त करावेत, त्यांना प्रशिक्षण द्यावे व त्यांच्या मार्फत नळ जोडण्या द्याव्यात, यासाठी नळ जोडणीच्या अनामत रक्कमेसह जे काही दर आहेत, ते मनपाने घेऊन नागरिकांना नळ जोडणी द्यावी. नळ जोडणीसाठी करण्यात आलेले रस्त्याचे खोदकाम दुरुस्त करण्याची मनपाची जबाबदारी आहे. त्याचा नागरिकांवर भुर्दंड टाकू नये. लागले तर यासाठी विशेष निधीच्या मागणीचा प्रस्ताव पाठवावा, असे केंद्रेकर यांनी सांगितले. नळ जोडणीच्या दरासंदर्भात आ.सुरेश वरपूडकर यांच्याशी चर्चा केली आहे. ते हे ही या संदर्भात सकारात्मतक असल्याचे केंद्रेकर यांनी सांगितले. याबाबत मनपा आयुक्त पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबींना दुजोरा दिला. या संदर्भात मनपा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवरनळ जोडणीच्या दराचे अंदाजपत्रक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी मनपाला तयार करुन दिले होते. विशेष म्हणजे ३ प्रकारचे अंदाजपत्रक या अधिकाऱ्यांनी मनपाला दिल्याची बाब विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्यांना गुरुवारी सकाळी बोलावून घेऊन धारेवर धरले. तसेच परभणी शहरात पाणी आणून देणे हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे काम आहे. बाकी दराबाबत मनपा निर्णय घेईल, त्यात तुम्ही लुडबूड का करता? असा सवाल करुन प्राधिकरणच्या अंदाजपत्रकामुळेच गडबडी झाल्या. त्यामुळे प्राधिकरणच्या सर्व अंदाजपत्रकांची तपासणी करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. 

अनधिकृत जोडणी घेतल्यास गुन्हे दाखल करा -केंद्रेकरनळ जोडणीचे दरही कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे ही योजना सुरळीत चालविण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. अनधिकृतपणे जर कोणी नळ जोडणी घेत असेल तर या संदर्भात संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्त पवार यांना दिले असल्याचे केंद्रेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तसे पत्र जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्तांना पाठविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Parbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिकाWaterपाणीDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय