शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीवाले दरोडेखोर, उद्धव यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 05:56 IST

पाच वर्षांपूर्वी तुमचं सरकार असताना ए टू झेड बाराखड्या कमी पडतील, अशा घोटाळ्यांचं पुस्तक मी काढलं होतं.

परभणी : पाच वर्षांपूर्वी तुमचं सरकार असताना ए टू झेड बाराखड्या कमी पडतील, अशा घोटाळ्यांचं पुस्तक मी काढलं होतं. ते वाचा आणि मग, मी तुम्हा काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना प्रश्न विचारतो, स्वत: घोटाळेबाज असताना आमच्यावर आरोप करता, तुम्हाला लाज वाटते का, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे केली़परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुका आल्यावर शरद पवारांना दुष्काळ असल्याचे कळले़पण, गेली पाच वर्षे शिवसैनिक दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून जात आहेत़ तेव्हा हे राष्ट्रवादीवाले घरामध्ये स्वत:ला कोंडून घेऊन बसले होते़ चारा छावणीला शरद पवारांनी भेट दिल्यानंतर एक गंमत मला कळली, तिथली लोकं घाबरली होती़ त्यांना मी का घाबरलात असे विचारले असता, ते म्हणाले की, गेल्या वेळी यांचं सरकार होतं, त्यावेळी यांनी शेण घोटाळा केला होता़ काय खायचं सोडलं नव्हतं़ शेण सुद्धा खाल्लं होतं त्यांनी. आता यांना दुष्काळग्रस्तांचा कळवळाआला आहे़ तुम्ही फिरतांय, कितीही फिरा, पण जो जोश भगव्यामध्येतो तुमच्या पक्षाच्या फडक्यामध्ये नाही़आमच्याकडे जोश आहे, तुमच्याकडे द्वेष आहे़ भ्रष्टाचाराचे आरोप कोणावर करतायं? स्वत: घोटाळेबाज आहात तुम्ही आणि चोर म्हणून युतीवर आरोप करता? दरोडेखोरांनी चोर कोण आहे ते ठरवायचा हा कोणता न्याय?, असा सवाल उद्धव यांनी केला.>‘शरद पवारांचे राजकारण संपले’एकदा सभेत मी लोकांना विचारलं, शरद पवारांची ओळख काय? तर लोकं म्हणाली भ्रष्टवादी़ मग शरद पवार पंतप्रधान चालतील का? असा प्रश्न करताच ते म्हणाले, ‘शरद पवारांना सांगा तुमचं राजकारण संपलयं़’

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019parbhani-pcपरभणी