शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

घोटाळेबाजांना मुख्यमंत्र्यांचे समर्थन- धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:25 IST

आमच्या सरकारमध्ये घोटाळा नाही, म्हणणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घोटाळेबाजांना समर्थन देतात, हाच घोटाळा नाही का? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना उपस्थित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड: आमच्या सरकारमध्ये घोटाळा नाही, म्हणणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घोटाळेबाजांना समर्थन देतात, हाच घोटाळा नाही का? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना उपस्थित केला.गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.मधुसूदन केंद्रे यांच्या प्रचारार्थ शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात मुंडे यांची शुक्रवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, उमेदवार डॉ. मधुसूदन केंद्रे, अ‍ॅड. संतोष मुंडे, बाबुराव गळाकाटु, मिथिलेश केंद्रे, माधव भोसले, युनूस शेख, अ‍ॅड.सय्यद अकबर, डॉ.फिरोज शेखल गिरीष सोळंके, उस्मान शेख आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, आमच्या सरकारमध्ये घोटाळा नाही, म्हणणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घोटाळेबाजांना समर्थन देतात, हा घोटाळा नाही का? घोटाळ्यातून कमावलेल्या पैशांच्या जोरावर राजकारण करणाऱ्या उमेदवारांना सहकार्य करुन पापाचे भागीदार होऊ नका, असे आवाहन यावेळी मुंडे यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. हे सरकार शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक यांच्या हिताविरोधात असल्याचे ते म्हणाले.राज्य व केंद्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांनीही घेतली आपली धास्ती४राज्यातीलच नव्हे तर केंद्रातील भाजपाच्या पदाधिकाºयांनीही आपली धास्ती घेतली असून माझा विजय रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माझ्या दारात सभा घेतली असल्याचे यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.४शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात राज्यातील व केंद्रातील भाजपाचे सरकार अपयशी ठरले आहे.४देशातील समस्यांकडे जनतेचे लक्ष जावू नये, यासाठी त्यांना भावनिक केले जात आहे; परंतु, जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :parabhaniपरभणीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Dhananjay Mundeधनंजय मुंडे