शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
3
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
4
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
5
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
6
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
7
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
8
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
9
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
10
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
11
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
12
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
13
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
14
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
15
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
16
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
17
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
18
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
19
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
20
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

१६०० चौरस फुट जागेत तांदळाने साकारली बाबासाहेबांची भव्य प्रतिमा; अभिवादनानंतर अन्नदान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 19:17 IST

परभणीत कला आणि समाजसेवेचा अनोखा संगम; १६०० चौरस फुटांवर कलाकृती, गरजूंच्या पोटालाही दिला आधार!

परभणी: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परभणी शहरात एक अत्यंत अभिनव आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात आला. विद्रोही फाउंडेशनने बिट्टू दातार यांच्या संकल्पनेतून चक्क तांदुळाचा वापर करून बाबासाहेबांची भव्य आणि आकर्षक प्रतिमा साकारली. ही कलाकृती केवळ अभिवादन नव्हते, तर त्यामागे अन्नदानाचा उदात्त सामाजिक उद्देश होता.

१६०० चौरस फुटांवर कलाकृतीशहरातील वांगी रोड भागातील ज्योतिर्गमयी शाळेसमोरील प्रांगणात ही अभूतपूर्व प्रतिमा साकारण्यात आली. कलाकार उद्देश पजळे यांनी आपल्या कलेतून या प्रतिमेला साकार रूप दिले. यासाठी तब्बल ३ क्विंटल ६९ किलो तांदूळ वापरण्यात आला. ही कलाकृती साधारण १६०० चौरस फूट इतक्या मोठ्या जागेवर साकारल्यामुळे, उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती आणि अनेकांनी या कलात्मक अभिवादनासमोर नतमस्तक होत आदराने वंदन केले.

अभिवादन, मग अन्नदानया अभिवादनाचे सर्वात महत्त्वाचे आणि भावनिक वैशिष्ट्य म्हणजे त्यामागे असलेला सामाजिक हेतू. या प्रतिमेसाठी वापरण्यात आलेला सर्व तांदूळ, महापरिनिर्वाण दिनानंतर गोरगरीब आणि गरजू लोकांना दान करण्यात येणार आहे. बाबासाहेबांनी आयुष्यभर उपेक्षितांसाठी आणि वंचितांसाठी लढा दिला. त्यांच्याच विचारांना अनुसरून, अभिवादनाची ही पद्धत निवडण्यात आल्याचे विद्रोही फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले. परभणीतील या अनोख्या कलाकृतीमुळे अभिवादन आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: Ambedkar's Grand Image Created with Rice, Followed by Food Donation!

Web Summary : On Dr. Ambedkar's death anniversary, Parbhani's Vidrohi Foundation created a 1600 sq ft rice portrait. Artist Udesh Pajale used 3.5 quintals of rice. The rice was then donated to the needy, honoring Ambedkar's principles of social justice.
टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरparabhaniपरभणी