शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीची छेड काढून दुसऱ्या गावात लपला; पोलिसांनी पाठलाग करून तरुणाला ताब्यात घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 14:37 IST

आरोपीस पोलिसांनी २४ तासांत पकडले; माहिती मिळताच विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालकांची पोलिस ठाण्यात गर्दी

परभणी: महाविद्यालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयात पायी जात असताना आरोपीने संबंधित तरुणीची छेड काढल्याचा प्रकार ६ डिसेंबरला घडली. याप्रकरणी आरोपीवर फिर्यादीने शनिवारी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी परळी तालुक्यातील धर्मापुरी येथून रविवारी रात्री उशिराने आरोपीचा पाठलाग करत त्यास २४ तासात ताब्यात घेतले.

परभणी शहरातील महात्मा फुले महाविद्यालय परिसरातील रस्त्याने मैत्रिणीसोबत सरकारी दवाखान्याकडे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे फिर्यादी तरुणी पायी जात होती. त्यावेळी तिच्या पाठीमागील बाजूने एका दुचाकी चालकांनी फिर्यादीच्या समोर येऊन फिर्यादीस लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. त्यानंतर दुचाकी चालक तेथून पळून गेला. या प्रकरणात फिर्यादी युवतीने नानलपेठ पोलीस ठाणे गाठून दिलेल्या माहितीवरून शनिवारी विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा नोंद होताच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने ही तातडीने पावले उचलली. 

आरोपी हा परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे असल्याचे समजतात पोलीस धर्मापुरीकडे रवाना झाले. मात्र पोलीस येत आहेत, याची कुणकुण लागताच आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढला. मात्र पोलिसांनी पाठलाग करत मोहम्मद असलम मोहम्मद सलीम (रा. वांगी रोड, परभणी) या आरोपीला पकडले. ही कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस उपाधीक्षक दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश कांबळे, शौएब पठाण, भगवान सोडगीर, अंबादास चव्हाण, संतोष सानप यांच्या पथकाने केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे करीत आहेत. 

२४ तासांत लावला शोध शनिवारी या प्रकरणांमध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर नानलपेठ पोलीस ठाण्याच्या वतीने दोन पथके तयार केली होती. पोलीस यंत्रणेकडून आरोपी बाबत कोणताही क्लू नसताना अवघ्या २४ तासात या आरोपीचा शोध लावण्यासाठी यंत्रणा कामाला लागली. त्यात केवळ दुचाकीचा क्रमांक होता मात्र संबंधित आरोपी कुठे राहतो किंवा काय करतो याविषयी माहिती नसताना गुप्त माहिती काढून यंत्रणेने आरोपीला ताब्यात घेतले.

परभणीकरांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक जिल्हा पोलीस दलाने अवघ्या एक दिवसात केलेल्या या कामगिरीमुळे परभणीतील नागरिक, विविध सामाजिक संघटना, याशिवाय पदाधिकारी यांनी समाज माध्यमावर असो की स्थानिक पातळीवर पोलिसांचे वैयक्तिक कौतुक केले.

आरोपीला दुपारी न्यायालयात हजर करणार सदरील घटनेतील आरोपीला सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात रविवारी दोन पथके विविध ठिकाणी पाठविली होती. स्थानिक गुन्हा शाखा दोन पथके, सायबर विभागाचे एक पथक, नानलपेठचे एक पथक यासाठी ऍक्टिव्ह होते. ठिकठिकाणी  नाकाबंदी करण्यात आली होती.

विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालकांची गर्दी आरोपीला ताब्यात घेतले याची माहिती झाल्यानंतर संबंधित प्रकरणातील महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनी याशिवाय पालक शिक्षक प्राध्यापक यांनी सुद्धा नाणेलपेठ पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी संबंधित सर्वांना मार्गदर्शन करून शांतता राखण्याचे आवाहन केले.

पोलीस अधीक्षकांनी केले कौतुक पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी सर्व पथकांचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे या कामगिरीबद्दल कौतुक केले.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषण