शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या वादातून रक्त सांडले; सार्वजनिक पाणवठ्यावर महिलेचा खून, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 13:25 IST

सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ किरकोळ वादाचे रूपांतर तीव्र भांडणात झाले.

- असगर देशमुखचारठाणा (परभणी) : जिंतूर तालुक्यातील पांगरी येथे किरकोळ वादाचे रूपांतर तीव्र हाणामारीत होऊन तीक्ष्ण हत्याराने मारहाण केल्याने एक महिला ठार झाली तर अन्य एक युवक, एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना २९ नोहेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संबंधित दोन  जखमीवर जिंतुरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

जिंतुर येथून परभणी रस्त्यावर पाच किलोमीटरवर पांगरी हे गाव असून गावातील सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ किरकोळ वादाचे रूपांतर तीव्र भांडणात झाले. यात अचानक एकाने तीक्ष्ण हत्याराने हल्ला करत दोन महिला, एका तरुणास गंभीर जखमी केले. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत ग्रामस्थांनी जिंतुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात व इतरांनी जखमींना खासगी वाहनातून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी मदत केली. तसेच ग्रामीण रुग्णालयात डॉ.गरड, परिचारिका हरकळे, परिचारिका मते, गंगाधर पालवे आदींनी उपचार केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच रुग्णालयात जिंतुरचे पोलीस निरिक्षक दिपक दंतुलवार, स.पो.नि.विलास कोकाटे, गोपीनाथ कोरके, मुरकुटे, लिला जोगदंड, ग्याळ आदींनी धाव घेत रुग्णालयात पंचनामा केला. 

दरम्यान, डाॅ.गरड यांनी तपासून सत्यभामा नागोराव मुंडे (३५, रा.जलालपुर, ता.औंढा) या महिलेस मृत घोषित केले. तर आशामती फकीरराव बुधवंत (४५, रा.पांगरी, ता.जिंतूर), ऋषिकेश नाथराव सांगळे (१८ रा.सांगळेवाडी ता.जिंतूर) या दोघांवर प्राथमिक उपचार करून परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरुजिंतुर येथील ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक, ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. तसेच सदर घटनेसंदर्भात जिंतूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, चौकशी अंती सदर घटना नेमकी कशामुळे घडली. त्याचे नेमके कारण काय? हल्ल्यात किती जणांचा सहभाग होता ही बाब स्पष्ट होईल, असा पोलीसांचा कयास आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीCrime Newsगुन्हेगारी