शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

परभणी विधानसभेच्या जागेवर भाजपचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:08 IST

परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मताधिक्य सातत्याने घटत असल्याने येथील जनता शिवसेनेला कंटाळली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत परभणीची जागा भाजपाला सोडण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याची माहिती भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणीविधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मताधिक्य सातत्याने घटत असल्याने येथील जनता शिवसेनेला कंटाळली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत परभणीची जागा भाजपाला सोडण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याची माहिती भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली़आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेल्या भूमिकेविषयी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली़ ते म्हणाले, परभणी विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली़ या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार परभणीच्या जागेवर भाजपाचा अधिकार असून, ही जागा भाजपाला सोडावी, यासाठी पक्षाकडे मागणी केली जाणार आहे़ आनंद भरोसे म्हणाले, मागील ३५ वर्षांपासून लोकसभेच्या निवडणुकीत परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मताधिक्य घटत आहे़ यावेळच्या निवडणुकीत हे मताधिक्य तब्बल ३२ हजारांनी घटले आहे़ लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून शिवसेनेच्या विजयासाठी हातभार लावला़ मात्र शिवसेनेतच गटबाजी झाली़ युतीसाठी एक-एक जागा महत्त्वाची असून, परभणी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मताधिक्य घटलेले असेल तर भाजपा कार्यकर्ते किती प्रयत्न करणार? असा सवाल करून परभणीत शिवसेनेला जनता कंटाळली आहे़ दरवेळी मताधिक्य घटत आहे़ भाजपाने या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पक्ष बांधणी केली आहे़ बुथनिहाय कार्यकर्ते भाजपाकडे असून, सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचून भाजप या ठिकाणी सक्षम पक्ष आहे़ याशिवाय मागील विधानसभा निवडणुकीतही भाजपाला चांगले मतदान मिळाले होते़ भाजप सरकारने परभणी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे़ जनसामान्यांची कामे केली आहेत, असे सांगून परभणीची जागा भाजपालाच सोडावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली़ ही मागणी करीत असताना भाजप सरकारने परभणी विधानसभा मतदारसंघासाठी दिलेल्या निधीची माहिती त्यांनी दिली़ तसेच साडेचार वर्षांच्या काळात भाजपाने केलेल्या कामांची माहितीही त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली़ या कामांच्या बळावर परभणीची जागा भाजपाला सोडून घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी करणार असल्याचे भरोसे यांनी सांगितले़ या पत्रकार परिषदेस भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भुमरे, महापालिकेतील गटनेत्या मंगला मुदगलकर, भाजप तालुकाध्यक्ष राजू देशमुख, भीमराव वायवळ, रितेश जैन, सुनील देशमुख, दिनेश नरवाडकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते़शिवसेना आमदारांवर केले गंभीर आरोप४या पत्रकार परिषदेत आनंद भरोसे यांनी शिवसेनेचे आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले़ ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आ.डॉ.राहुल पाटील यांनी शिवसेनेच्याच विरोधात काम केले़४त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ते मते कशी मागणार? असा सवाल केला़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी परभणी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला़४परंतु, शिवसेनेचे आमदार मात्र आपणच ही कामे मंजूर करून आणल्याचे श्रेय घेत असून, कामांचे उद्घाटन करीत आहेत़ या दोन्ही मुद्यांवरून आनंद भरोसे यांनी आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा