शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोनपेठ येथे विविध मागण्यांसाठी भारीपचा जनआक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:31 IST

भारिप बहूजन महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज दुपारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

सोनपेठ (परभणी ) :  येथील तहसील कार्यालयावर भारिप बहूजन महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज दुपारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

आज दुपारी शहिद मुंजाभाऊ तेलभरे चौका येथून मोर्चास सुरूवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छञपती शिवाजी महाराज चौक मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयात पोहचला. यावेळी तहसिलदार यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. 

निवेदनात गायरान पट्टे गायरान धारकाच्या नावे करावेत, कोरेगाव दंगालीचा मुख्य सुञधार संभाजी भिडे यांना अटक करावी, मागासवर्गीय स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढावे, मराठा, धनगर, व मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आदी मागण्या करण्यात आल्या. 

मोर्चामध्ये अनिल डोंगरे, रामेश्वर पंडीत,  जिल्हाध्यक्ष प्रवीण कनकुटे, युवक जिल्हा अध्यक्ष दिलीप मोरे, सुधाकर ब्रम्हराक्षे, सुशिल सोनवणे, कचरूबा मुंढे, महिंद्र ठेंगे, रूस्तुम तुपसमुद्रे, श्रीमंत सावंत, धम्मपाल सोनटक्के, आनंद तिरमले, विजय तुपसमुद्रे आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :agitationआंदोलनparabhaniपरभणीTahasildarतहसीलदार