फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:17 AM2021-05-19T04:17:19+5:302021-05-19T04:17:19+5:30

परभणी : फेसबुक अकाउंट हॅक करून त्यावरून पैशांची मागणी करण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढले आहेत. तशा तक्रारीही सायबर सेलकडे दाखल ...

Beware if money is demanded from Facebook | फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान

फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान

Next

परभणी : फेसबुक अकाउंट हॅक करून त्यावरून पैशांची मागणी करण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढले आहेत. तशा तक्रारीही सायबर सेलकडे दाखल झाल्या आहेत.

सोशल मीडियाचा वापर वाढल्यानंतर आता या मीडियाचा दुरुपयोग करून फसवणुकीचे प्रकार मागील काही वर्षांपासून होत आहेत. सुरुवातीच्या काळात मोबाइलवर फोन करून एटीएम कार्डचा पासवर्ड, बँकेची माहिती मागवून परस्पर पैसे लाटल्याचे प्रकार घडले आहेत. त्याचप्रमाणे मोबाइल नंबर हॅक करून त्यावरूनही पैसे ऑनलाइन अकाउंटच्या साह्याने बँक खात्यातून परस्पर पैसे काढण्याचे प्रकारही घडले आहेत. मात्र, मागच्या काही दिवसांपासून फेसबुक अकाउंट हॅक करून किंवा त्याच नावाचे नवीन अकाउंट तयार करून त्यावरून पैसे मागण्याचा प्रकार वाढला आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडे तक्रारीही दाखल झाल्या असून हॅक केलेले फेसबुक अकाउंट बंद करून उपाययोजना केली जात आहे; परंतु आपल्या फेसबुक अकाउंटवरून पैशांची मागणी होत असेल तर नागरिकांनी वेळीच सावध राहून उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

परिचयातील व्यक्तींच्या नावाचा वापर

फेसबुक अकाउंटवरील प्रोफाइल सर्वांना पाहता येत असल्याने या अकाउंटमधील फ्रेंड लिस्टमधील परिचयाच्या व्यक्तींच्या नावांचा वापर करून पैशांची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे.

फेसबुक अकाउंटवरील प्रोफाइलचा फोटो वापरून त्याच नावाने दुसरे अकाउंट तयार करून त्या अकाउंटवरून पैसे मागण्याचेही प्रकार जिल्ह्यात घडले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत फेसबुक अकाउंटच्या साह्याने पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी पोलीस प्रशासनाकडे दाखल आहेत. या तक्रारीनंतर संबंध अकाउंट बंद केले जाते; परंतु नागरिकांनीच याविषयी काळजी घेण्याची गरज आहे.

अशी घ्या काळजी

फेसबुक अकाउंट वापरकर्त्यांनी प्रोफाइल सेटिंगमध्ये जाऊन केवळ मित्रांनाच प्रोफाइल दिसेल, अशा पद्धतीने सेटिंग करावी. तसेच प्रोफाइलला पासवर्ड वापरावा. अकाउंट हॅक झाल्याचे लक्षात येताच हे अकाउंट बंद करावे.

Web Title: Beware if money is demanded from Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.