शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील २० प्रकल्पांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:55 IST

यावर्षीच्या पावसाळी हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात प्रकल्पांचा पाणीसाठा वाढला नाही़ सद्यस्थितीला येलदरीसह २० प्रकल्पांनी तळ गाठल्याने टंचाईचे संकट अधिकच गंभीर झाले आहे़ पुढील वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंत पावसाची शक्यता नसल्याने याच पाणीसाठ्यावर ९ महिन्यांचा काळ काढावा लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या पावसाळी हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात प्रकल्पांचा पाणीसाठा वाढला नाही़ सद्यस्थितीला येलदरीसह २० प्रकल्पांनी तळ गाठल्याने टंचाईचे संकट अधिकच गंभीर झाले आहे़ पुढील वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंत पावसाची शक्यता नसल्याने याच पाणीसाठ्यावर ९ महिन्यांचा काळ काढावा लागणार आहे़परभणी जिल्ह्यातील येलदरी, निम्न दुधना, करपरा, मासोळी या प्रमुख प्रकल्पांबरोबरच गोदावरी नदीवर बांधलेले पाच बंधारे आणि पाटबंधारे विभागाच्या गाव तलाव व लघु तलावांमधील पाणीसाठ्यावर उन्हाळ्यातील पाणीटंचाईची भिस्त अवलंबून असते़ प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असेल तर भूजल पातळीही स्थिर राहते़ परिणामी पाणीटंचाईची तीव्रता कमी होते़ मात्र यावर्षी पावसाळ्यामध्ये वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३० टक्के पाऊस कमी झाला आहे़ त्यामुळे प्रकल्पांमध्ये पाणीसाठा जमा झाला नाही़ त्याचे परिणाम जिल्हावासियांना भोगावे लागत आहेत़उपलब्ध झालेल्या माहितीनुसार येलदरी प्रकल्पामध्ये सध्या १९५़७९३ दलघमी पाणी उपलब्ध असून, प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्याच्या तुलनेत केवळ ८़८ टक्के पाणी शिल्लक असल्याने टंचाईची दाहकता वाढली आहे़येलदरी प्रकल्पातून परभणी, जिंतूर, पूर्णा, वसमत या शहरांबरोबरच ग्रामीण भागातील १०० हून अधिक पाणीपुरवठा योजना चालतात़ मात्र प्रकल्पात पाणीसाठा शिल्लक नसल्याने या सर्व पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य धोक्यात आले आहे़ याच प्रकल्पावर अवलंबून असलेल्या सिद्धेश्वर प्रकल्पातही २़६ टक्के पाणी उपलब्ध आहे़ सिद्धेश्वर प्रकल्पातून परभणी शहरासाठी एक पाणी पाळी घेतली असून, पुढचा टप्पा मिळतो की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़येलदरी प्रकल्पाबरोबर जिल्ह्यातील इतर १९ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने टंचाईची परिस्थिती वाढत आहे़ या २० ही प्रकल्पांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यात गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात ०़४ टक्के, परभणी तालुक्यातील पेडगाव येथील तलावात १२़११ टक्के, अंबेगाव येथील तलावात ०़५४ टक्के , गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव तलावात १८़०६ टक्के, टाकळीवाडी तलावात ८़२२ टक्के, पिंपळदरी तलावात ४़९२ टक्के, दगडवाडी तलावात १़९३ टक्के, डोंगरपिंपळा तलावात ९़७९ टक्के, भेंडवाडी तलावात १६़१८ टक्के, जिंतूर तालुक्यातील चिंचोली तलावात १२़२९ टक्के, आडगाव तलावात १३़१९ टक्के, केहाळ येथील तलावामध्ये ३़२६ टक्के आणि दहेगाव येथील तलावात १४़८५ टक्के पाणी उपलब्ध आहे़या सर्वच प्रकल्पांमधील पाणीसाठ्याने तळ गाठला असून, प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरत आहेत़ विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यातच ही परिस्थिती असून, या प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने हे पाणी जुलै महिन्यापर्यंत पुरवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे़निम्न दुधना, करपराने तारलेजिल्ह्यात २० प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध नसला तरी सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पामध्ये १४१़९८० दलघमी (१६़३ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे़ तर जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पामध्ये १८़२४३ दलघमी (५७़५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून, या दोन्ही प्रकल्पांमुळे थोड्याफार प्रमाणात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत आहे़ याशिवाय ढालेगाव बंधाऱ्यात ४१ टक्के, मुदगल बंधाºयात ३६ टक्के आणि डिग्रस बंधाºयातील ५५ टक्के पाणी आशादायक आहे़मोठ्या प्रकल्पांमध्ये ९ टक्के पाणीपरभणी जिल्ह्यात पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत ३ मोठे प्रकल्प आहेत़ त्यात निम्न दुधना, येलदरी आणि सिद्धेश्वर प्रकल्पाचा समावेश आहे़ या तिन्ही प्रकल्पांमध्ये मिळून केवळ ९़२३ टक्के पाणी शिल्लक आहे़ त्याच प्रमाणे गोदावरी नदीवरील बंधारे आणि लघु प्रकल्पांची संख्या ७ एवढी असून, या सातही प्रकल्पात केवळ ३१़८१ टक्के पाणी उपलब्ध आहे़ लघु प्रकल्पांमध्ये २२ तलावांचा समावेश असून, या तलावातील पाणीसाठाही समाधानकारक नसल्याने पाण्याचे संकट गंभीर होत आहे़मुळी बंधारा : पडला कोरडाठाकगंगाखेड तालुक्यामध्ये पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे़ गंगाखेड शहराला मासोळी मध्यम प्रकल्प आणि मुळी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा केला जातो़ सद्यस्थितीला मुळीचा बंधारा पूर्णत: कोरडाठाक पडला असून, मासोळी प्रकल्पातही केवळ ७ दलघमी पाणी उपलब्ध आहे़ त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे़ मुळी आणि मासोळी या दोन्ही प्रकल्पांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे़ त्याच प्रमाणे सोनपेठ तालुक्यातीलच नखातवाडी या तलावात सांडव्याखाली पाणीसाठा असून, हा तलावही कोरडाठाक आहे़ नखातवाडी तलावाची पाणीसाठवण क्षमता १़७६६ दलघमी एवढी असून, या प्रकल्पात सध्या ०़१२७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे हा प्रकल्प कोरडा पडल असून, तालुक्यातील पाण्याचे संकट अधिक गंभीर झाले आहे़अवैध उपसा थांबवाप्रकल्पांमध्ये उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले असले तरी या पाण्याचा अवैध उपसा होत आहे़ तो थांबवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प