शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video: क्षणात झालं होत्याचं नव्हतं! वादळीवाऱ्याने केळीच्या बागा भुईसपाट, लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 12:46 IST

अचानक वादळीवाऱ्यासह पाऊस आल्याने सर्वत्र हाहाकार माजला.

- विठ्ठल भिसेपाथरी -  अचानक आलेल्या प्रचंड वादळीवाऱ्याने तालुक्यातील केळी बागांच्या फडाला अक्षरशः जमीनदोस्त केले. पाथरगव्हाण ( बु ) येथील एका शेतकऱ्यांची आठ एकर बाग वाऱ्यात जमीनदोस्त झाली यात 35 लाख रुपये पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. तसेच कासापुरी पाथरी भागांतील काही शेतकऱ्यांच्या  केळी बागा कोलमडून पडल्या आहेत. एकंदरीत नुकसानीचा आकडा कोटींच्या घरात गेला  आहे. 

पाथरी तालुक्यात जायकवाडी धरणाचा डावा कालवा आणि गोदावरी नदीच्या पात्रातील तीन बंधारे यामुळे सिंचनाची सोय आहे. बारमाही सिंचन होत असल्याने इतर पिकासोबत उस आणि केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. यावर्षी पाणी अधिक उपलब्ध असल्याने केळीचे फड जोमदार आले होते. केळीच्या बागांना सतत पाणी द्यावे लागते. बागा पाण्यात असल्याने अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका केळी बागांना बसला आहे. रविवारी 4 जून रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तालुक्यात अचानक वादळी वारे मोठ्या प्रमाणावर वाहू लागले. सगळीकडे वाऱ्याचे लोट आणि वादळी पाऊस आल्याने सर्वत्र हाहाकार माजला.

पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण ( बु) येथील मनीषा प्रताप घाडगे, द्रोपदी रामचंद्र घाडगे एकूण केळीचे क्षेत्र आठ एकर भुईसपाट झाले आहे. काही वेळात होत्याचे नव्हते झाले. यात जवळपास 35 लाख रुपये अंदाजित नुकसान झाले आहे. तसेच तुकाराम घाडगे , किशन घाडगे यांची 5 एकर वरील तर कासापुरी येथील 3 शेतकऱ्यांचे 6 एकर केळी बाग उध्वस्त झाली. त्याचबरोबर पाथरी येथील संजू पामे, हरिकिशन गायकवाड, राजेभाऊ देवडे, उद्धव सत्वधर यांची आठ एकर केळी बाग जमीनदोस्त झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. 

तातडीने पंचनामे करा केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी. - एकनाथ घाडगे, संचालक बाजार समिती पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस