शासकीय कार्यालयात ५० कर्मचारी उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:16 AM2021-04-11T04:16:44+5:302021-04-11T04:16:44+5:30

भुईमूग पेरण्याची शेतकऱ्यांची तयारी परभणी : या वर्षीच्या उन्हाळी हंगामात जायकवाडी प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, निम्न दुधना ...

Attendance of 50 employees in government office | शासकीय कार्यालयात ५० कर्मचारी उपस्थिती

शासकीय कार्यालयात ५० कर्मचारी उपस्थिती

Next

भुईमूग पेरण्याची शेतकऱ्यांची तयारी

परभणी : या वर्षीच्या उन्हाळी हंगामात जायकवाडी प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, निम्न दुधना प्रकल्पातूनही उन्हाळी हंगामासाठी पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तिसरा हंगामही घेण्याचा निर्णय घेतला असून, त्यात भुईमूग पेरण्याची तयारी सुरू केली आहे. परिणामी, यंदा भुईमुगाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

डॉक्टर लेन भागातील रस्त्यावर अतिक्रमण

परभणी : येथील डॉक्टर लेन भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लघू विक्रेत्यांनी स्टॉल्स मांडले आहेत. संपूर्ण जिल्हाभरातून या ठिकाणी रुग्ण येतात. त्यामुळे सुरळीत वाहतुकीसाठी या भागात पुरेशा प्रमाणात रुंद रस्त्याची आवश्यकता आहे. मात्र, आधीच रस्ता अरुंद आणि त्यात अतिक्रमण झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना कसरत करावी लागते.

नागरी सुविधांकडे मपनाचा कानाडोळा

परभणी : शहरात मागच्या दोन वर्षांपासून नागरी सुविधा पुरविताना मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आहे त्या सोईसुविधांवर नागरिकांना भागवावे लागत आहे. अनेक भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही भागात नाल्या तयार करण्याची गरज आहे. पथदिवे, पिण्याचे पाणी या समस्याही निर्माण झाल्या असताना मनपा प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

रोहयोची कामे जिल्ह्यात ठप्प

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने, त्याचा परिणाम सर्वच घटकांवर झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून केल्या जाणारी रोजगार हमी योजनेची कामेही सध्या ठप्प आहेत. विशेष म्हणजे, मोठ्या शहरात रोजगारासाठी गेलेेले मजूर आता जिल्ह्यात परतले आहेत. या मजुरांना काम देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र, रोहयोची कामे बंद ठेवल्याने मजुरांची उपासमार होत आहे.

Web Title: Attendance of 50 employees in government office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.