शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यास काळे फासण्याचा प्रयत्न; संभाजी ब्रिगेड, मनसे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 17:33 IST

परभणी येथील विमा कार्यालयात तोडफोड करत अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न

- सत्यशील धबडगे मानवत: पिक नुकसानीचे पंचनामा झाले नसल्याने संतप्त संभाजी ब्रिगेड व मनसे कार्यकर्त्यांनी परभणी येथील विमा कंपनीच्या कार्यालयाची आज दुपारी तोडफोड केली. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केल्याने एकच गोंधळ झाला.

मानवत तालुक्यात 21 दिवसापासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे जी पिके उगवली आहेत, ती देखील पाण्याअभावी करपून जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. परिणामी शेतकरी चांगलाच धास्तावला असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे पंचनामे करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड व मनसे कार्यकर्त्यांनी आयसीआयसीआय लोमार्ड विमा कंपनी व जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती. तसेच १० ऑगस्ट रोजी मागणी पूर्ण करण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. 

दरम्यान, आजपर्यंत पंचनामा करण्यात आले नसल्याने संतप्त संभाजी ब्रिगेड व मनसेचे कार्यकर्ते परभणी येथील पिकविमा कंपनीच्या कार्यालयात धडकले. संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष गोविंद घांडगे, मनसे तालुका अध्यक्ष माऊली दहे मनसेचे दत्तराव शिंदे,अर्जुन टाक, महादेव काकडे, , बालाजी पौळ, हनुमान मस्के, शहराध्यक्ष संतोष कुन्हाडे केशव काकडे, गणेश लाडाणे, आदित्य आवचार, शिवाजी लाडाणे, लक्ष्मण शिंदे आदींनी कंपनीचे अधिकारी बेदरेकर यांना दिरंगाईचा जाब विचारला. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर देता न आल्याने कार्यकत्यांनी संताप व्यक्त करत कार्यालयातील फर्निचरची मोडतोड केली. तसेच अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणी