शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

पाथरी येथील आनंदवन आंतरराष्ट्रीय शाळा बोगस; संस्था चालकांवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 18:54 IST

दोन वर्षानंतर कारवाई झाल्याने 164 विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

पाथरी (परभणी ) :  पाथरी येथील आनंदवन इंटरनॅशनल स्कूल या शाळेला शासनाची मान्यता नाही. असे असताना बनावट दस्तऐवज वापरून अनधिकृत आणि नियमबाह्य शाळा चालवून पालक आणि विद्यार्थ्यांचे फसवणूक केल्या प्रकरणी पाथरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अधिकारी विश्वास खोगरे यांच्या फिर्यादीवरून संस्था चालकांवर शनिवारी (दि.१५ ) गुन्हा दाखल करण्यात आला.  गेली दोन वर्षे बोगस शाळा चालवली जात असताना शिक्षण विभाग मात्र चौकशी करत राहिल्याने शाळेत प्रवेश घेतलेल्या 164 विद्यार्थीचे भवितव्य धोक्यात आले आहे. 

डॉक्टर सलीम मेडिकल एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेची पाथरी येथे आनंदवन इंटरनॅशनल स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा शहरात 2015 / 16 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली. सध्या या शाळेमध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू आहेत. सदरील शाळेला शासनाची मान्यता नसल्याची तक्रार पाथरी येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल साळवे यांनी शिक्षणाधिकारी परभणी यांच्याकडे करत अनाधिकृत शाळा सुरू असल्या प्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिक्षण अधिकारी परभणी यांच्या आदेशानुसार गट शिक्षणाधिकारी पाथरी यांनी या शाळेच्या मान्यतेबाबत चौकशी करून वरिष्ठाकडे अहवाल दाखल केला होता. 29 जानेवारी 2019 रोजी शिक्षणाधिकारी परभणी यांनी पाथरी गटशिक्षणाधिकाऱ्यांना सदरची शाळा अनधिकृत असल्यामुळे या शाळेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकरण करण्यात आले होते. सदर शाळेतील 164 विध्यार्थ्यांना जवळच्या मान्यता प्राप्त शाळेत समायोजित करण्याच्या लेखी सूचना शिक्षण विभागाने देऊन ही प्रवेशित केले नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.  त्याच बरोबर शाळा स्थलांतरित मान्यता नसताना ही टी सी निर्गमित केल्याचे चौकशीत आढळून आले आहे. त्यानंतर 4 जून 2019 रोजी शिक्षण विभागाने सदर शाळा बंद करून शाळेतील 164 विद्यार्थी जवळच्या मान्यता प्राप्त शाळेत वर्ग करण्या बाबत ससंस्थेला पत्र दिले. मात्र, संस्थेकडून कारवाई झाली नाही, त्यामुळे शनिवारी (दि. 15 ) गटशिक्षणाधिकारी विश्वास खोगरे यांनी पाथरी पोलीस ठाण्यात अनधिकृत शाळा चालवणे आणि अनधिकृत स्थलांतर प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देणे, आणि विध्यार्थी व पालक यांची दिशाभूल केल्याची तक्रार दिली. यावरून डॉ शेख सलीम शेख अमीन यांच्यावर पाथरी पोलिस ठाण्यामध्येकलम 468, 471, 420 भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उप निरीक्षक आवेज काझी हे तपास करत आहेत. 

टॅग्स :SchoolशाळाfraudधोकेबाजीEducation Sectorशिक्षण क्षेत्रparabhaniपरभणी