शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्यांच्या भांडणात टोकाचे पाऊल; दोघींनी बालकाची हत्या करून मृतदेह फरशीखाली पुरला

By राजन मगरुळकर | Updated: January 17, 2023 16:39 IST

अपहरणाच्या घटनेनंतर तपासात बाब उघड : पूर्णा तालुक्यातील सिद्धेश्वर नगर कळगावचा प्रकार

- गजानन नाईकवाडे ताडकळस : शेतातून परत येत असताना तीन वर्षीय मुलाचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार ताडकळस ठाण्यात शुक्रवारी दाखल झाली होती. या घटनेत स्थानिक गुन्हा शाखा व ताडकळस पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये जुन्या भांडणाचा राग मनात धरून बदला घेण्याच्या उद्देशाने शेजारी राहणाऱ्या दोन महिलांनी सदरील अपहृत बालकाचा खून केल्याचे निष्पन्न झाले. या बालकाचा मृतदेह आरोपी महिलांनी त्यांच्या घरातील फरशीखाली पुरला होता. हा मृतदेह मंगळवारी सकाळी तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचनामा करून बाहेर काढण्यात आला.

पूर्णा तालुक्यातील सिद्धेश्वर कळगाव परिसर येथील गणेश भीमराव धोत्रे यांनी शुक्रवारी ताडकळस ठाण्यात फिर्याद दिली होती. ज्यात नमूद केले की, गणेश धोत्रे यांची पत्नी महानंदा ही शेतातून परत येत असताना त्यांचा एकुलता एक मुलगा गोविंद गणेश धोत्रे (३) याचे कुणीतरी अज्ञात ईसमाने अपहरण केले. त्यावरून ताडकळस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. ताडकळस पोलीस या अनुषंगाने तपास करीत होते. पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी सदरील घटनेची संवेदनशीलता ओळखून चार पथके तपासासाठी नेमली. नमूद गुन्ह्यातील अपहृत बालक व अज्ञात आरोपीचा शोध ताडकळस ठाण्याच्या हद्दीत घेताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदरील अपहृत बालकास शेजारी राहणाऱ्या कावेरी गजानन बनगर हिने उचलून घेऊन जात त्यास ठार मारून जमिनीत पुरल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या नमूद संशयित महिलेला ठाण्यात बोलवून अपहृत बालकाबाबत विश्वासात घेऊन विचारणा केली.

अंगणात खेळणाऱ्या बालकास नेले उचलूनआमच्या अंगणात गोविंद गणेश धोत्रे हा बालक खेळत असताना त्यास उचलून घेऊन आमच्या घरात नेत जीवे ठार मारून स्वतःच्या घरामध्ये एका कोपऱ्यात पुरले आहे, असे कावेरी बनगर हिने पोलीसांना सांगितले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून बदला घेण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे कबूल केले. यामध्ये आरोपी कावेरी गजानन बनगर व तिची सासू अन्नपूर्णा बालासाहेब बनगर (दोन्ही रा. सिद्धेश्वर नगर, कळगाव, ता.पूर्णा) यांनी हा प्रकार केल्याचे सांगितले.

तहसीलदारांच्या उपस्थितीत केला पंचनामापोलीस पथकाने मंगळवारी सकाळी सदरील आरोपी महिलेच्या घरामध्ये जाऊन तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचनामा केला. त्यामध्ये मयत बालकाचे प्रेत घरातील एका फरशीखाली आढळले. हा मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला. दोन्ही आरोपी महिलांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेत ताडकळस ठाण्याच्या स्वाधीन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी