शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला चिरडले; अपघातानंतर चालक ट्रक सोडून पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 18:13 IST

गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकाकडे जाताना ट्रकने चिरल्याने झाला जागीच मृत्यू

- सत्यशील धबडगेमानवत: शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरातील मानवत ते पाथरी राष्ट्रीय महामार्गावररस्ता ओलांडणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाला भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने चिरडले. यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. नागोराव गंगाराम जोहरुले असे मृताचे नाव आहे. तालुक्यातील कोथाळा येथील नागोराव गंगाराम जोहरुले (वय ६५) हे तहसील कार्यालयातील खाजगी  कामासाठी मंगळवारी सकाळी मानवतला आले. तहसील कार्यालयातील काम झाल्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास मानवत ते पाथरी राष्ट्रीय महामार्गावरून गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकाकडे निघाले. एमआरएफ शोरूम समोरून रस्ता ओलांडताना पाथरीहून परभणीला जाणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने (क्रमांक एम एच १६ सीसी ७४७५) नागोराव यांना चिरडले. यात नागोराव जोहरुले यांचा जागीच मृत्यू झाला. 

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पो उ नि किशन पंतगे,  पोलीस हवालदार शेख मुनू नारायण सोळंके,  नरेंद्र कांबळे सुनीलसिंह बावरी यांनी अपघातस्थळी धाव घेत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. या प्रकरणी गंगाधर जोहरूले यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाच्या विरोधात मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे हे करत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघातDeathमृत्यू