शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

आधीच सिलिंडर हजाराच्या घरात; घरपोहोचसाठी वेगळी लूट कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:22 AM

परभणी : एकीकडे प्रत्येक महिन्याला गॅस सिलिंडरचे दर वाढत असताना दुसरीकडे मात्र प्रत्येक सिलिंडरमागे तीस रुपये अधिकचे डिलिव्हरी चार्जेस ...

परभणी : एकीकडे प्रत्येक महिन्याला गॅस सिलिंडरचे दर वाढत असताना दुसरीकडे मात्र प्रत्येक सिलिंडरमागे तीस रुपये अधिकचे डिलिव्हरी चार्जेस घेतले जात आहेत. यातून ग्राहकांची लूट होत आहे.

जिल्ह्यात इंधनाचे दर वाढत आहेत. याबरोबरच स्वयंपाकाचा गॅस महाग होत आहे. सहा महिन्यांमध्ये साधारणत: दोनशे रुपयांनी गॅस महागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत आले आहेत. गॅस दरवाढीबरोबरच गॅस सिलिंडर घरपोहोच देण्यासाठी अधिकचे तीस रुपये घेतले जातात. डिलिव्हरी चार्जेसच्या नावाखाली ही रक्कम घेतली जात आहे. या रकमेची पावतीदेखील संबंधित ग्राहकाला दिली जात नाही.

विशेष म्हणजे, एकाही एजन्सीधारकाने ग्राहकाकडून अधिकचे पैसे घेऊ नयेत, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले असताना त्याकडे मात्र गॅस एजन्सीधारकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गॅस दरवाढीपाठोपाठ अधिकच्या रकमेतून सर्वसामान्य ग्राहकांची लूट सुरूच आहे. ग्राहकांनीच जागरुक होऊन डिलिव्हरीसाठी अधिकची रक्कम न दिल्यास या प्रकाराला आळा बसू शकतो. त्यामुळे ग्राहकांनीच आता जागरुक होण्याची गरज निर्माण झाली आहे.

वर्षभरात १५० रुपयांची वाढ

जानेवारी महिन्यात जिल्ह्यात ७९५ रुपयांना गॅस सिलिंडर मिळत होते. त्यानंतर मार्च महिन्यात ८४५ रुपये, एप्रिलमध्ये ८३५ रुपये, मेमध्ये ८३५ रुपये, जूनमध्ये ८३५, जुलै महिन्यात ८६५, ऑगस्टमध्ये ८८५ आणि सप्टेंबर महिन्यात ९१० रुपयांंना सिलिंडरचे दर झाले आहेत. याचाच अर्थ ८ महिन्यांत गॅस सिलिंडरचे दर १५० रुपयांनी वाढले असून, त्यात वर पुन्हा ३० रुपये द्यावे लागतात. त्यामुळे प्रत्येक महिन्यात ग्राहकाला १८० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

डिलिव्हरी बॉयला वेगळे ३० रुपये कशाला?

गॅस सिलिंडरच्या दरात घरपोहोच करण्याचे दर निश्चित करून दरवाढ केली जाते. त्यामुळे पुन्हा वर पैसे कशासाठी द्यायचे, हा प्रकार म्हणजे सरळ सरळ ग्राहकांची लूटच आहे. तो थांबला पाहिजे.

शुभांगी परळीकर

गॅस सिलिंडर आधीच महाग होत आहे. त्यात पुन्हा वर पैसे द्यायचे म्हणजे ग्राहकांची लूटच आहे. गॅस एजन्सीधारकांनी डिलिव्हरीसाठी अधिकचे पैसे घेणे बंद करावे.

वृंदावनी खरबे

वितरकांनीच पुढाकार घेणे आवश्यक

गॅस एजन्सीवरील डिलिव्हरी बॉयकडून ही रक्कम घेतली जाते. त्यामुळे वितरकांचे त्यांच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. गॅस वितरकांनीच याकामी पुढाकार घेऊन अधिकचे पैसे घेणाऱ्या डिलिव्हरी बॉयविरुद्ध कारवाई करणे आवश्यक आहे.