शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

परभणीला येणाऱ्या सर्व रस्त्यांवर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:28 AM

रस्त्यांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करून सुरू असलेल्या कामांचे संबंधित ठिकाणी इत्यंभूत माहितीसह फलक लावण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या निर्णयाचे राष्टÑीय महामार्ग प्रधिकरणसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उल्लंघन करण्यात आले आहे़ त्यामुळे परभणी शहरास जोडणाºया चारही प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था कायम आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रस्त्यांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करून सुरू असलेल्या कामांचे संबंधित ठिकाणी इत्यंभूत माहितीसह फलक लावण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या निर्णयाचे राष्टÑीय महामार्ग प्रधिकरणसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उल्लंघन करण्यात आले आहे़ त्यामुळे परभणी शहरास जोडणाºया चारही प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था कायम आहे़रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात मुंबई उच्च न्यायलायात ७१/२०१३ ही जनहित याचिका २०१३ मध्ये दाखल करण्यात आली होती़ या याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने १२ एप्रिल २०१८ रोजी निकाल दिला होता़ या निकालामध्ये रस्त्यांच्या अनुषंगाने न्यायालयाने अनेक महत्त्वपूर्ण निर्देश राज्य सरकार व इतरांना दिले होते़त्यामध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीच्या अनुषंगाने येणाºया तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य शासन, सर्व महानगरपालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सिडको, एमबीपीटी आदींनी त्यांच्या पातळीवर तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा, तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करावा़ नागरिकांच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक निर्माण करून संबंधित ठिकाणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, नागरिकांना त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने रस्त्यांचे फोटो अपलोड करता येतील, अशी वेबसाईट निर्माण करावी, तसेच त्यांनी केलेल्या तक्रारींची स्थिती दर्शविणारी सुविधा उपलब्ध करून द्यावी, नागरिकांच्या तक्रारीनंतर तीन आठवड्यांच्या आत केलेल्या कारवाईची माहिती संबंधित वेबसाईटवर अपलोड करावी़ या संदर्भातील सर्व माहिती सेंट्रललाईज करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने तशी व्यवस्था करावी, तसेच संबंधित रस्त्याचे काम सुरू असल्यास त्याबाबतची इत्यंभूत माहिती दर्शविणारे फलक त्या ठिकाणी दर्शनी भागात लावावेत़ ही सर्व प्रक्रिया ३१ जुलै २०१८ पूर्ण करून त्याची अंमलबजावणी पूर्ण करावी, तसेच प्रसार माध्यमांमध्ये यासंदर्भात १ आॅगस्टपर्यंत जनजागृती करण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध कराव्यात, असेही निर्देश उच्च न्यायालयाने आपल्या ६१ पानांच्या निकालपत्रात दिले होते़ त्यामुळे या अनुषंगाने राज्यभर कारवाई होणे अपेक्षित होते; परंतु, तसे होताना दिसून येत नाही़ गेल्या सहा महिन्यांत परभणी जिल्ह्यात उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई झालेली नाही़ उलट परभणी शहरात इतर जिल्ह्यातून येण्यासाठी असलेल्या परभणी-गंगाखेड, परभणी- मानवतरोड, परभणी-जिंतूर, परभणी- वसमत या चारही रस्त्यांची दयनीय स्थिती कायम आहे़ या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असली तरी त्या कामांना गती नाही़ परिणामी या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले आहे़ शिवाय खड्डे पडले आहेत़ त्यामुळे या रस्त्यावरून वाहने घेवून जात असताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते़ शिवाय रस्त्याच्या वेळी वाहनधारकांना सूचना देण्यासंदर्भातील कुठलीही यंत्रणा येथे स्थापन केली गेली नसल्याने अपघाताच्या प्रमाणामध्येही वाढ झाली आहे़ यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर काहींना अपंगत्व आले आहे़याचे सोयरसूतक मात्र वरिष्ठ अधिकाºयांना नाही़ दोन वर्षांपासून या रस्त्यांची दयनीय अवस्था असताना लोकप्रतिनिधींनी याकडे गांभिर्याने पाहिले नाही़ शिवाय प्रशासकीय पातळीवरही प्रमुख अधिकाºयांकडून या कामांचा आढावा घेतला जात नाही़ परिणामी विविध कारणांनी ही कामे अनेक वेळा थांबतात किंवा मंदगतीने सुरू राहतात़ याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे़ लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याकडून संबंधित कामांना गती मिळण्याच्या अनुषंगाने कारवाई होत नसल्याने आता उच्च न्यायालयानेच या संदर्भात लक्ष घालून १२ एप्रिल २०१८ च्या दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़चार प्रकारच्या तक्रारी स्वीकारण्याची न्यायालयाने दिली होती सूचना४मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्यांच्या दयनीय स्थिती संदर्भात सर्व महानगरपालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सिडको, एमबीपीटी यांच्याकडून तक्रार निवारण यंत्रणा स्थापित केल्यानंतर नागरिकांच्या ४ प्रकारच्या तक्रारी स्वीकारण्याचे निर्देश दिले होते़४त्यामध्ये नियुक्त केलेल्या कार्यालयात लेखी तक्रारी देणे, स्थापन केलेल्या टोल क्रमांकाद्वारे प्राप्त तक्रारींची नोंद घेणे, वेबसाईटवर दाखल तक्रारींची नोंद घेणे तसेच मोबाईल फोनद्वारे आलेले एसएमएस अशा चार माध्यमांतून आलेल्या तक्रारी स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या़४तसेच चारही पद्धतीने दाखल तक्रारंीच्या आधारे केलेल्या कारवाईचा पाठपुरावा करून या संदर्भातील संबंधितांना उपलब्ध करून देण्यासाठी ट्रॅकिंग सुविधा संबंधित वेबसाईटवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते़ परभणी जिल्ह्यात राज्य शासनाने किंवा महानगरपालिकेने यासंदर्भात अशी व्यवस्था निर्माण केली नसल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे एक प्रकारे उल्लंघन होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा