सणासुदीच्या काळात या दोन्ही रेल्वेला आरक्षण मिळत नसल्याने व जनरल डब्बे नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. नांदेड-परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद येथे ये-जा करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. सणासुदीच्या काळात महालक्ष्मी-गणपतीमुळे अनेकांना ऐनवेळी आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे दुसऱ्या रेल्वेंनी ये-जा करताना जनरल डब्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे या दोन रेल्वेला अतिरिक्त डब्बे जोडण्याची मागणी होत आहे. रेल्वे प्रशासनाने जनरल तिकीट लागू करून हे डब्बे जोडल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होऊ शकेल.
डेमू पॅसेंजर वाढवा
सध्या नांदेड- औरंगाबाद मार्गावर केवळ दोन डेमू पॅसेंजर सुरू आहेत. या पॅसेंजर रेल्वेची संख्या वाढविणे गरजेचे आहे. छोट्या स्थानकांसह तालुक्याच्या ठिकाणी थांबणाऱ्या पॅसेंजर रेल्वेमुळे ग्रामीण भागातील अनेकांना विविध साहित्याची विक्री करणे तसेच बाजार करण्यासाठी ये-जा करणे सोपे होऊ शकते. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.