शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सासुरवाडीतील नवजात लेकीचा लळा लागला, मध्यरात्री भेटीस निघालेल्या बापाचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:13 IST

पाथरी ते पोखरणी रस्त्यावर मंगरूळ बुद्रुक शिवारात झाला अपघात

मानवत ( परभणी): माहेरी असलेल्या बाळंत पत्नीला आणि नवजात मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या दुचाकीवरील तरुणाचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मानवत तालुक्यातील पाथरी पोखरणी रस्त्यावर मंगरूळ (बु.)  शिवारात गुरुवारी पहाटे 3 वाजता घडली.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, शेख अल्ताफ शेख सलीम (25, रा. रुमना जवळा ता.गंगाखेड) यांची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी आलेली आहे. दोन आठवड्यापूर्वी त्यांना एक गोंडस मुलगी झाली. एक दोन वेळेस ते पत्नी आणि लाडक्या लेकीला भेटायला गेले. दरम्यान, नवजात लेकीचा लळा लागल्याने तिला भेटण्यासाठी रूमना जवळा येथून गुरुवारी पहाटे शेख अल्ताफ शेख सलीम हे दुचाकीवरुन (क्रमांक एमएच  22 बीए 3036) मानवतच्या दिशेने निघाले. 

मात्र, पहाटे 3 वाजेच्या सुमारास पाथरी ते पोखरणी रस्त्यावर मंगरूळ बुद्रुक शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात शेख अल्ताफ शेख सलीम यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स पो उ नि भारत नलावडे, महेश रनेर यांनी घटनास्थळी धाव घेतली.पंचनामा करून शहरातील ग्रामीण रुग्णालयात दुपारी 1 वाजता शवविच्छेदन करण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघातDeathमृत्यू