शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर उभ्या ट्रॉलीवर दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 12:19 IST

मानवत तालुक्यातील नागरजवळा येथील घटनेत दुचाकीस्वार जागीच ठार

मानवत (परभणी) : तालुक्यातील नागरजवळा रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर पाठीमागून दुचाकी धडकल्याने अठरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ( दि. २९) रात्री ७. ३० वाजता घडली. पांडुरंग बालासाहेब होगे असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे ट्रॉली उभी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पांडुरंग बालासाहेब होगे (१८) हा मानवत तालुक्यातील नागरजवळा येथील रहिवासी आहे. बुधवारी रात्री आपल्या दुचाकीवरून पांडुरंग मानवतकडून गावी परतत होता. रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मानवत ते नागरजवळा रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टरच्या ( क्रमाक एम एच 21 डी 3568) ट्रॉलीवर पांडुरंगची दुचाकी धडकली. यात पांडुरंगचा जागीच मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप बोरकर  , पो उ नि पाटील , पो हा भारत नलावडे,बंकट लटपटे ,विजय लबडे , शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी विठ्ठल बाबासाहेब होगे यांच्या तक्रारीवरून चालकाविरुद्ध ट्रॅक्टर-ट्रॉली धोकादायक स्थितीत, कोणतीही काळजी न घेता रस्त्यावर उभी करून पांडुरंग बालासाहेब होगे याच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा आज पहाटे दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूparabhaniपरभणी