शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'आत्महत्या करावीशी वाटते', वरिष्ठांसोबत वादानंतर बेपत्ता झालेला पोलीस कर्मचारी सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 12:35 IST

पोलीस कर्मचाऱ्यांनी स्टेट्स पाहताच एकच खळबळ उडाली. मात्र, मोबाईल बंद असल्याने कर्मचाऱ्याचा शोध लागत नव्हता.

पाथरी (परभणी):  ड्युटीवर असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कामकाजावरून झालेल्या वादानंतर आत्महत्या करावीशी वाटत आहे, असे स्टेट्स अपडेट करून बेपत्ता असलेला पोलीस कर्मचारी मुदखेड रेल्वे स्थानक परिसरात सापडला आहे. पाथरी पोलिसांनी आज सकाळी कर्मचाऱ्याला कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे. 

जमादार रफिक मुस्ताक अन्सारी पाथरी पोलीस ठाण्यात गोपनीय शाखेत कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी ठाण्यातील कामकाजावरून पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांच्यासोबत जमादार अन्सारी यांचा वाद झाला. त्यानंतर जमादार अन्सारी यांनी, अधिकाऱ्यांनी आपल्याला अपमानित केल्याने आपणास आत्महत्या करावी वाटते, असे व्हाट्सअप स्टेटस अपडेट करून मोबाईल बंद करून ठाणे सोडले. 

पोलीस कर्मचाऱ्यांनी स्टेट्स पाहताच एकच खळबळ उडाली. मात्र, मोबाईल बंद असल्याने कर्मचाऱ्याचा शोध लागत नव्हता. शेवटच्या मोबाईल लोकेशनवरून पाथरी पोलीसांच्या पथकाने शोध सुरू केला. दरम्यान, आज पहाटे हा कर्मचारी मुदखेड रेल्वेस्थानक परिसरात आढळून आला. पोलिसांनी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान त्याला पाथरी येथे आणले. त्यानंतर त्याला कुटुंबाकडे स्वाधीन केले आहे. यामुळे पोलिस यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीPoliceपोलिस