शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 11:17 IST

श्रावणात शोककळा, परतीच्या मार्गावर असलेल्या भाविकांवर काळाचा घाला

- विठ्ठल भिसे पाथरी ( परभणी) : पाथरी-सेलू मार्गावर खेडूळा पाटीजवळ आज, सोमवारी ( दि. ११ ) पहाटे भरधाव कार कावड यात्रेत घसून झालेल्या भीषण अपघातात दोन भाविक जागीच ठार झाले, तर दोन गंभीर जखमी झाले. ऋषिकेश अशोक शिंदे (रा. सेलू) आणि एकनाथ गंगाधरराव गजमल (रा. डासाळा, ता. सेलू) अशी मृत भाविकांची नावे आहेत. श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर कोसळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

श्रावण सोमवार निमित्त सेलूहून पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथे आलेल्या कावड यात्रेतील सुमारे २५० भाविक परतीच्या मार्गावर असताना पहाटे अंदाजे ५ वाजता कारने थेट यात्रेत घुसून हा अपघात घडला. या दुर्घटनेत ऋषिकेश अशोक शिंदे (रा. सेलू) आणि एकनाथ गंगाधरराव गजमल (रा. डासाळा, ता. सेलू) हे जागीच ठार झाले. तर दोन गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पाथरी पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके , जैस्वाल, थोरे आणि इतर कर्मचारी तातडीने 5.20 वाजता  घटनास्थळी धाव घेतली व पुढील तपास सुरू आहे.

श्रावण महिन्याचे औचित्य साधून संकल्प अखंड हिंदू राष्ट्र समितीच्यावतीने आज सकाळी सेलू येथील रेल्वे गेटपासून कावड यात्रेला सुरुवात होणार होती. यासाठी सेलू शहरात मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली होती. विविध भागात फलक, बॅनर लावून वातावरण निर्मिती करण्यात आली होती. सेलू शहरासह तालुक्यातील शेकडो तरुण यात सहभागी झाले होते. रेल्वे गेटवरून सुरू झालेली ही यात्रा शंकर लिंग मंदिर, सुरज मोड येथे मिरवणुकीनंतर समाप्त होणार होती. मात्र, कावड यात्रा सेलू येथे पोहचण्यापूर्वी पाथरीतील अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण सेलू शहरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातparabhaniपरभणी