शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा तडाखा; खडकपूर्णा, येलदरी, सिद्धेश्वर तीनही धरणातून पूर्णापात्रात मोठा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 12:37 IST

पूर्णा नदीवर तीन धरण असून सद्यस्थितीत हे तीनही धरणे शंभर टक्के भरलेली आहेत.

येलदरी वसाहत (परभणी) : परतीच्या पावसाने पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात धुमाकूळ घातला आहे. खडकपूर्णा, येलदरी व सिद्धेश्वर या तिन्ही धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत असल्याने  पूर्णा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पूर्णपणे विभागाअंतर्गत करण्यात आले आहे.

खडकपूर्णा धरणाचे 19 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडून त्यातून  44 हजार 395 क्युसेकने विसर्ग करण्यात आल्याने येलदरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता शुक्रवारी पहाटे येलदरी धरणाचे 2 आणि सकाळी 9 वाजता 2 अशी 4 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडून विसर्ग करण्यात आला. येलदरी धरण सद्यस्थितीत 100 % भरले असल्याने अतिरिक्त आवक झाल्यास धरणाचे आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली आहे. 

परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण भरण्यासाठी संपूर्ण पावसाळा वाट पाहावी लागली. मात्र पावसाळ्याअखेर पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरण 100%  भरले. मात्र, पावसाचे प्रमाण वाढल्याने पूर नियंत्रण करण्यासाठी येलदरी धरणाचे दरवाजे उघडावे लागले आहेत. विशेष म्हणजे, पूर्णा नदीवर तीन धरण असून सद्यस्थितीत हे तीनही धरणे शंभर टक्के भरलेली आहेत. त्यामुळे या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यानंतर विसर्ग करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नसतो. दरम्यान, परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा पूर्णा नदी परिसराला बसला आहे. यामुळे खडकपूर्णा धरण, येलदरी धरण व सिद्धेश्वर धरण या तीनही धरणातून मोठ्या प्रमाणात पूर्णा नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पूर्णा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :DamधरणWaterपाणीparabhaniपरभणी