शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘ रमाई आवास’साठी पाथरी तालुक्यात ७९२ प्रस्ताव दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 16:55 IST

रमाई आवास घरकूल योजनेसाठी पाथरी तालुक्याला ५८४ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ डिसेंबर अखेर यासाठी ७९२ लाभार्थ्यांचे प्रस्ताव दाखल झाले असून, या प्रस्तावांची छाननी पंचायत समितीस्तरावर सुरू आहे़ 

पाथरी ( परभणी ): रमाई आवास घरकूल योजनेसाठी पाथरी तालुक्याला ५८४ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ डिसेंबर अखेर यासाठी ७९२ लाभार्थ्यांचे प्रस्ताव दाखल झाले असून, या प्रस्तावांची छाननी पंचायत समितीस्तरावर सुरू आहे.

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील लोकांचे राहणीमान उंचावे तसेच त्यांच्या निवाºयाचा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामीण व शहरी भागात त्यांच्या स्वत:च्या जागेवर घरकूल बांधून देण्याची रमाई आवास योजना शासनाने सुरू केली आहे. यासाठी २०११ च्या जातनिहाय सर्वेक्षणानुसार प्राधान्यक्रम यादीच्या निकषाबाहेरील असावा, अशी अट यामध्ये ठेवण्यात आली असून, या अंतर्गत १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते़ पाथरी तालुक्यासाठी २०१७-१८ या वर्षात ५८४ घरकूल बांधकामांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या अंतर्गत लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते़ या अंतर्गत ३१ डिसेंबर अखेर ७९२ लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीकडे दाखल केले आहेत़ सध्या या प्रस्तावांची छाननी सुरू आहे़

इंदिरा आवासच्या याद्यांचीही छाननीकेंद्र शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत पूर्वी मागासवर्गीय कुटूंबियांना लाभ दिला जात होता़ रमाई आवास योजनेसाठी लाभार्थ्यांचे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर या सर्व प्रस्तावांची छाननी करताना इंदिरा आवास योजनेच्या पूर्वीच्या सर्व लाभार्थ्यांच्या यादीचीही छाननी करण्यात येत आहे़ रमाई आवास योजनेसाठी दाखल झालेल्या प्रस्तावांबाबत परभणी येथे सहाय्यक समाजकल्याण आयुक्त यांच्या कार्यालयात ९ जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये अंमलबजावणीसाठी चर्चा होणार आहे़ यानंतर लाभार्थी निवडले जाणार आहेत़ ही प्रक्रिया पूर्ण करून धनादेश देण्यात यावेत, अशी मागणी होत आहे़ 

सर्वाना लाभ मिळणार रमाई आवास योजनेसाठी दाखल झालेल्या प्रस्तावात पात्र लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. पात्र लाभार्थ्यांची संख्या वाढली तरी लाभ मिळणार आहे़ - ए.एफ. शेख, सहाय्यक गटविकास अधिकारी

टॅग्स :parabhaniपरभणीHomeसुंदर गृहनियोजन